जामखेड: जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील आहुजा निवास समोरील अगदी मुख्य रस्त्यावरील उघडी डीपी दुर्घटनेला निमंत्रण देत आहे. वारंवार तक्रार देऊनही कुणीच दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असताना तेथील राहिवासी यांनी महालोकवाणी न्यूजचे जामखेड प्रतिनिधी पत्रकार धनराज पवार यांना फोन करून बातमीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यास सांगितले,दखल घेत त्वरित बातमी करून अवघ्या ८ दिवसांत महावितरण कंपनीने डिपीचे काम केले.

ठिकाणी होणाऱ्या त्रासाला लोक कंटाळले आहेत असे अनेक प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास युवा पत्रकार धनराज पवार यांनी आणून दिले. तपनेश्वर रोड येथील आहुजा निवास समोरील ट्रान्सफार्मर (डिपी मुख्य मार्गावरच अगदी रस्त्यावर ही डीपी आहे. वरच्या भागात ट्रान्सफार्मर आणि यावरून मुख्य वीजवाहिनी आहे. मुख्य डीपी पुरती मोडकळीस आली होती. पूर्वी ही यंत्रणा रस्त्याच्या कडेला होती. आता सिमेंट रस्ता तयार झाल्याने डीपी अगदी रस्त्यावर आली आहे. सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली जात नव्हती, जनावरांचा नेहमीच वावर होता.

लहान मुले रस्त्याच्या कडेला खेळत असते. तसेच फिरण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांना याच डीपीपासून जावे लागत होते. एखादवेळी दुर्लक्ष झाल्यास मुले डीपीकडे जाण्याचा धोका असतो. पादचाऱ्यांनाही अगदी डीपीजवळून जावे लागते.कधीही धोका संभवू शकतो. वस्तीतील मंडळींना बाहेर पडण्यासाठी हाच मार्ग आहे. ही बातमी सर्वत्र सोशल मीडियावर पडताच नागरिकांनी कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांना फोन केला तसेच नागरिकांनी माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवावा.असे सांगितले दखल घेत त्वरित आमदार प्रा राम शिंदेनी महावितरण कंपनीचे उप अभियंता योगेश कासलीवाल यांना संपर्क करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी सांगितले.

या डिपी चे काम वायरमन संतोष अष्टेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी काळजीपूर्वक काम केल्याबद्दल व युवा पत्रकार धनराज पवार यांनी बातमीच्या माध्यमातून हा गंभीर प्रश्न सोडविल्याबद्दल नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच तात्काळ प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार प्रा राम शिंदे यांचे नागरिकांनी आभार मानले.
यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, संजय राऊत सर, डॉ अशोक बांगर, युवा नेते राम पवार, भाजपा शहर उपाध्यक्ष बाबासाहेब फुलमाळी, शिवकुमार डोंगरे, सचिन देशमुख,प्रशांत चव्हाण, प्रकाश सांगळे, गणेश मासाळ, विशाल जाधव, विजय क्षिरसागर, गोकुळ क्षिरसागर, नंदकुमार खराडे,खंडू भोसले आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
