Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जामखेड नगर परिषदेचा भोंगळ कारभार.!

जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जामखेड नगर परिषदेचा भोंगळ कारभार.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 6, 2023Updated:July 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार

जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील सारीका साडी सेंटरच्या पाठीमागे आबा समुद्र यांच्या घरासमोर
तळ्याचे रुप आले असून तेथील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.पावसाळ्याचे दिवस असून त्याठिकाणी पावसाचे पाणी साठत आहे. हे पाणी दूषित असून हे घरात नागरिकांच्या घरात जात असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येताना पाहायला मिळत आहे. हे दूषित पाणी घरात शिरल्यामुळे घरातील लहान मुले- वयस्कर मंडळी यांना साथीचे आजार होऊ शकतात, याला सर्वस्वी जबाबदार हे , जामखेड नगरपरिषद असणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .

फक्त 999 मध्ये Jio चा 4G फोन Jio Bharat V2 लाँच; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.!

या रस्त्यावर ये – जा करता येत नाही तसेच दुर्गंधी पसरली आहे.या पाण्यामध्ये गटार जवळ असल्याने मच्छर ,अळ्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.यामुळे डेंग्यू, ताप चे बरेच रुग्ण आढळले आहे,या संदर्भात जामखेड नगर परिषदेला अर्ज व मुख्याधिकारी यांना भेटून ही कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही अशी माहिती तेथील रहिवासी नागु गायकवाड यांनी दिली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येताना दिसत आहे

या ठिकाणच्या रहिवाशी रुपाली पवार म्हणाल्या की, मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत आहे, तसेच मुलं आजारी पडली आहे, आमच्या प्रश्नांची जामखेड नगर परिषद दखल घेत नाही.आम्ही माणसं नाहीत का? मुलांचे आरोग्य धोक्यात असून यास जबाबदार कोण?

आम्ही वेळोवेळी या संदर्भात जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना भेटून अर्ज व विनंती केली आहे , पण त्यावर त्यांनी अद्याप पर्यंत काहीच निर्णय घेतलेला नाही, पावसाला सुरवात झाली आहे, त्यामुळे हे काम होणे महत्वाचे आहे, जर हे काम तात्काळ मार्गी न लावल्यास येथील सर्व नागरिक घरासमोरील साचलेल्या पाण्यामध्येच बसून उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे , यावेळी तेथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवसंत टेकडी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने साई उत्सव संपन्न; नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी मानले सर्वांचे आभार.!
Next Article नादुरूस्त हातपंप दुरूस्त करून बोल्हेगाव गांधीनगर भागातील नागरिकांसाठी केले पाणी उपलब्ध; नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचा पुढाकार
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.