Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी| माणिकदौंडी घाटात इथेनॉलचा टँकर पलटी; दोन जणांचा जागीच मृत्यू टँकर मध्ये होते अनेक प्रवाशी.! भयानक व्हिडिओ आला समोर..

पाथर्डी| माणिकदौंडी घाटात इथेनॉलचा टँकर पलटी; दोन जणांचा जागीच मृत्यू टँकर मध्ये होते अनेक प्रवाशी.! भयानक व्हिडिओ आला समोर..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 6, 2023Updated:July 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी वृत्तसेवा

पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी घाटात इथेनॉलचा टँकर पलटी झाला. या अपघातादरम्यान टँकरने पेट घेतल्याने आत बसलेल्या दोघांना बाहेर निघता न आल्याने मयत झाले, तर अन्य काहीजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ६जुलै) ११ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समजली आहे.

गणेश रामराव पालवे (वय ४२ रा.पालेवाडी), सुरैया बशीर शेख (वय ४६ रा. माळी बाभूळगाव ता. पाथर्डी) असे दोन जण आगीत जळून मृत झालेल्याचे नावे आहेत. लहू सांडू पवार वय ५३, सुमन लहू पवार वय ४९, जगदीश जगन पवार वय ३, कोमल जगन पवार वय ७ (रा. विसरवाडी ता. पैठण) असे जखमीचे नावे आहेत.
गणेश पालवे हा या टँकरचा दुसरा चालक असून गणेश हा टँकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता, त्याच बाजूने टँकर पलटल्याने तो टँकर खाली सापडला त्यामुळे चेहरा जळाला नसून उर्वरित शरीर मात्र आगीमध्ये पूर्ण जळून खाक झाले आहे. तर महिला पूर्णतः जळून खाक झाली आहे.

पहा व्हिडिओ

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात इथेनॉल वाहुतक करणाऱ्या टँकरला लागली आग.. दोन जणांचा मृत्यू.. अनेक जण जखमी#इथेनॉल pic.twitter.com/tpAUV9ZDKz

— Mahalokwani (@mahalokwani) July 6, 2023

गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला वळणावर इथेनॉलने भरलेला टँकर उलटून अपघात झाला. त्यानंतर टँकरमधील पाच जण सुखरूप बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले. तर टँकर चालवणारा मुख्य चालक दादासाहेब अंकुश केकाण टँकरमधून उडी मारून पळाला. गणेश पालवे व सुरैया बशीर शेख हे दोन जण टँकर मध्ये अडकल्याने त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. जखमींना पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

फक्त 999 मध्ये Jio चा 4G फोन Jio Bharat V2 लाँच; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.!

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस हवालदार नितीन दराडे, राम सोनवणे, अल्ताफ शेख, सुहास गायकवाड, किशोर लाड, प्रल्हाद पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने टँकरची लागलेली आग आटोक्यात आणून विझवली. त्यानंतर पोलिसांनी आगीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटवून नावे निष्पन्न केले. टँकरचा फरार झालेला मुख्यचालक दादासाहेब केकाण याचा पोलीस शोध घेत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहर व तालुक्यातील डीजे वर बंदी घाला; बॅंन्जो- बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ तहसीलदारांना दिले निवेदन
Next Article JIO जिओ कंपनी तर्फे गरीब व्यक्तीला मिळणार Jio Bharat V2 मोबाईल अगदी फ्री; जामखेडमध्ये मिळाला गरीब व्यक्तीला फ्री मोबाईल..!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.