जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार
विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. तसेच बस सेवा सुरू करण्यात यावे ,या मागणीसाठी एस टी डेपो चे मॅनेजर शिंदे यांना आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जामखेड तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, साकत कडभनवाडी, पिंपळवाडी कोल्हेवाडी – सावरगांव – धोत्री या गावातील भरपूर विद्यार्थी हे जामखेड याठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यांना जामखेड याठिकाणी येणाऱ्या जाण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर करावा लागत आहे. खाजगी वाहनाचा प्रवास विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनीना हा धोक्याचा ठरत आहे.तरी साकत, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, सावरगांव, धोत्री याठिकाणी एस.टी. बस थांबा सुरू करा. मे.साहेबांनी साकत ते जामखेड एस.टी. सेवा विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत सुरू करावी जेणे करून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. ही नम्र विनंती. बस सेवा सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देत आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी जामखेड आगाराची राहील.

यावेळी बोलताना टापरे म्हणाले की,ग्रामीण भागात एसटी बस सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी काही खासगी वाहनातून ग्रामीण भागातील विद्यार्थांना ५० ते १०० रुपये खर्च करून प्रवास करावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. ही गैरसोय दूर करून विद्यार्थांना एसटी बसची सुविधा मिळून द्यावी , अन्यथा मागणी पूर्ण न झाल्यास बस डेपो चे फाटक बंद करुन डेपो मध्ये कोणतीच बस येवू देणार नाही ,ग्रामीण भागात बस सेवा त्वरित सुरू केल्यास पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात येईल .यावेळी प्रदिप टापर),बालाजी भोसले (शहराध्यक्ष),अनिल पाटील (शहर उपाध्यक्ष), पै.नितीन जाधव,पै.आकाश साठे,बालु मराळ, सागर घुमरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.