महालोकवाणी न्यूज:-
पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे
स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे अवैद्य मुरूम उत्खनन सध्या जोरात सुरू असताना ग्रामपंचायत स्वामी चिंचोली यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले की स्वामीचिंचोली हद्दीतून गेली चार ते पाच दिवसापासून जोरात उत्खनन सुरू आहे या ठिकाणी दहा ते पंधरा दहा टायर हयवा गाड्या दररोज दिवसभर भरून वाहतुक भिगवणच्या दिशेने जात आहेत.दिनांक 27 रोजी माननीय प्रांत गायकवाड साहेब .यांचे समोर
तहसीलदार पाटील साहेब यांनी ग्रामस्थांचे व प्रत्रकार यांचे समोर मंडल अधिकारी नेवसे व.गाव कामगार तलाठी जयंत भोसले यांना आदेश केला होता की सदरच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून ज्या ठिकाणी मुरूम वाहतूक केली जात आहे तेथे शाळकरी मुलांचा वावर होत आहे रस्ता रहदारीच्या ठिकाणाहून जात असल्याने जिवितहानी नाकारता येत नाही त्याबाबत ग्रामपंचायत ने तक्रार दिलेली आहे त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी उत्खनन बंद करण्यात यावे परंतु आज दिनांक 28 /12 /2022 रोजी कसलीही कारवाई मंडल अधिकारी नेवसे व गाव कामगार तलाठी जयंत भोसले यांनी का केलेली नाही कारवाई का होत नाही याचे गोडबंगाल काय आहे अशी चर्चा स्वामी चिंचोली या गावात जोरात चालूआहे.
ग्रामसेवक श्री कांबळे यांनी .माध्यमांशी बोलताना सांगितले ग्रामपंचायतची कसलीही परवानगी नाही उत्खनन बंद करा म्हणून सांगितले आहे तरी मगरूर ठेकेदार ऐकत नाहीत पर्यावरणाचा र्रास होत आहे म्हणून योग्य ती कारवाई व्हावी… साईनाथ मदने व रमेश पवळ शिवसेना उप तालुका प्रपमुख म्हणाले की मंडल अधिकारी आणि तलाठी काहीच कारवाई करत नाही त्यामुळे गावात फार मोठा संशय निर्माण झाला आहे लोकांमधे विविध चर्चेला उधान आले आहे..
