जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार
दोन खोल्यांच्या कामाचे भूमिपूजन करतांना आकाश बाफना
वडीलांचा वसा आणि वारसा पुढे चालवत असताना आज रोजी जामखेड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद चे चेअरमन दिलीप बाफना यांचे पूत्र आकाश बाफना यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ,निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

कुमारी क्रिषा आकाश बाफना हिच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह, मोहा फाटा (समता भूमी) ता-जामखेड जि- अहमदनगर येथे मुले व मुलींचे वसतिगृह येथे मुलींना राहण्यासाठी खोली बांधून देण्याचे आश्वासन आकाश बाफना यांनी दिले आहे. तसेच निवारा बालगृहातील लहान मुलांना व मुलींना अल्पोपहार देण्यात आला.
आकाश बाफना यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ,निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. pic.twitter.com/x4w2Mpb7D7
— Mahalokwani (@mahalokwani) July 19, 2023
वाचा : जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार

Table of Contents
यावेळी माजी जिल्हा परिषद चेअरमन दिलीप बाफना, उद्योगपती लखीचंद बाफना, उद्योगपती अशोक शिंगवी, उद्योगपती महेश नगरे, युवा उद्योगपती गौतम (दादा) बाफना, युवा उद्योजक आकाश बाफना, यश बाफना, बाळासाहेब नवसरे, कृष्णराव चौहान सर, परशुराम भांगे, दत्तात्रय जगताप आदी बाफना परिवार सह महिला , निवारा बालगृहातील अधिक्षक वैजनाथ केसकर, शिक्षक संतोष चव्हाण, शिंदे सर व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद चे चेअरमन दिलीप बाफना यांची प्रतिक्रिया
जामखेड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद चे चेअरमन दिलीप बाफना यांची प्रतिक्रिया pic.twitter.com/AaG0vVFfxA
— Mahalokwani (@mahalokwani) July 19, 2023
आकाश बाफना यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ,निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
