Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ahmednagar अहमदनगरमध्ये जमिनीचा महाघोटाळा ; सात शासकीय अधिकारी यांच्यासह 32 खाजगी लोकांवर गुन्हा दाखल.!

Ahmednagar अहमदनगरमध्ये जमिनीचा महाघोटाळा ; सात शासकीय अधिकारी यांच्यासह 32 खाजगी लोकांवर गुन्हा दाखल.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 20, 2023Updated:July 20, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Ahmednagar अहमदनगरमध्ये जमिनीचा महाघोटाळा

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९ जुलै):-खोटे कागदपत्र तयार करुन,जमिनीची खरेदी विक्री व्यवहार केल्या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,सहाय्यक दुय्यम निंबंधक नगर Ahmednagar ,तहसिलदार,तलाठी,मंडळ अधिकारी,यांच्यासह 32 खाजगी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कामगिरी केली आहे.बातमीतील हकीगत अशी की,दि.३/१ २००६ रोजी पूर्वी ते दि.६/१/२००६ रोजी मौजे वडगांव गुप्ता शिवारातील गट नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर, गट नं.२०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर,३४ आर ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसिलदार अहमदनगर यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे.

नगरमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी; गुन्हेगार मोकाट मात्र सर्वसामान्यांनाच पोलिसांचा त्रास.!

यातील Nagar तहसिलदार एल.एन.पाटिल यांनी काढलेल्या आदेशास एल.एस.रोहकले तत्कालीन तलाठी सजा वडगाव गुप्ता दुर्गे,तत्कालीन मंडळ अधिकारी,नालेगांव यांनी मदत केली आहे व खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाहय फेरफार नोंदी घेवुन खाजगी इसम उत्कर्ष पाटिल व अजित लुंकड यांना मदत केली आहे.तसेच तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर Ahmednagarव्ही.टी.जरे व तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग राजेंद्र मुठे यांना सदरचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असुन देखील त्यांनी कुठलीही कारवाई करता,बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होवुन सदर व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे असे दिसुन येत आहे.

Table of Contents

    आणि दिलीप बबन निराली,तत्कालीन सह दुय्यम निबंधक,अहमदनगर- २ यांनी खरेदी विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविले आहे.तसेच नमुद जमिनीचे भोगवाटादार दिनकर आनंदा शिंदे,विनायक शंकर शिंदे, बाबु आनंदराव शिंदे,मोहन आनंदराव शिंदे,वामन किसन शिंदे,यादव किसन शिंदे,सदाशिव केशव शिंदे, रामभाऊ केशव शिंदे,सुनिल केशव शिंदे,यादव केशव शिंदे,श्रीमती मालनबाई केशव शिंदे,श्रीमती लता शांतवण भाकरे,अरुण दगडु शिंदे, शालनबाई दगडु शिंदे,लक्ष्मण रामचंद्र शिंदे,मथुरा विष्णु शिंदे,संदिप विष्णु शिंदे सुनिता रतन गायकवाड,नंदा शाम घाटविसावे,शालुबाई शाहुराव प्रभुणे,मच्छिंद्र आनंदाव शिंदे, लिलाबाई चंद्रभान पाडळे, शोभा बुध्दीराम ठाकुर,तसेच संमती देणार वत्सलाबाई तुकाराम पाचारणे,

    सुशिला शांतवण घाटविसावे, तुळसाबाई मारुती नरवडे, छबुबाई भिवाजी साळवे, इंद्रायणी विठठल जाधव, वत्सला वामन जाधव,कौसल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार उत्कर्ष सुरेश पाटील रा.श्रमिकनगर आनंदऋषीजी मार्ग अहमदनगर Ahmednagar व जमिन खरेदी करणारे अजित कचरदास लुंकड,रा.आनंद दर्शन अपार्टमेंट मार्केटयार्ड, अहमदनगर यांना सदरची जमिन हि महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन असल्याचे माहित असुन देखील त्यांनी वरिल नमुद तहसिलदार यांना सदर जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर परवानगी देण्यासाठी मदत करुन,खोटे कागदपत्र तयार करुन,सदर जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करुन दस्त नोंदणी करुन ७/१२ उताऱ्यावर व फेरफार नोंदी घेतलेल्या आहेत व दस्त तयार करुन शासनाची फसवणुक केली आहे.

    या बाबत एम.आय.डी.सी.पो.स्टे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३(१)(ड) सह १३(२) सह भा.दं.वि.क. १६७, ४२०, १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक श्री. प्रविण लोखंडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Nagar अहमदनगर हे करीत आहेत. सदरची कारवाई ही शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र,नाशिक,माधव रेडडी,अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्र, नाशिक नरेंद्र पवार,वाचक पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्र,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Nagar अहमदनगरकडील Ahmednagar पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे,पोलीस निरीक्षक/राजु आल्हाट,पोहेकॉ/संतोष शिंदे, पोकॉ/रविंद्र निमसे,पोना/विजय गंगुल यांनी पथकाने केली आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleजामखेडमध्ये बाफना कुटूंबातील चिमुकलीचा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा; बालगृहातील मुलींना राहण्यासाठी दोन खोल्या बांधणार-आकाश बाफना
    Next Article Rajpal|राजपालमध्ये पावसाळी सेलसाठी ग्राहकांची मोठी गर्दी; मिळतेय प्रत्येक खरेदीवर भरघोष सूट..
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.