Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Pune : थेट विद्यापीठाकडून मिळणार योगशास्त्राचं प्रमाणपत्र, या पद्धतीनं करा अर्ज !

Pune : थेट विद्यापीठाकडून मिळणार योगशास्त्राचं प्रमाणपत्र, या पद्धतीनं करा अर्ज !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 28, 2022Updated:December 28, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकत असून या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक 2 जानेवारी 2023 पासून याचे प्रवेश अर्ज सुरू होत असून दिनांक 14 जानेवारी 2023 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.दीपक माने यांनी दिली आहे.

नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल !

किती जागा आहेत उपलब्ध?

यासाठी 50 जागा असून प्रथम प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी भारतीय तसेच परदेशी विद्यार्थी देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या अभ्यासक्रमाची वेळ दररोज दुपारी 3 ते 6 आहे. विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. सदर अभ्यासक्रमात पारंपारिक योग व निरोगीपणा योग पद्धती शरीरविज्ञान आणि योग विज्ञान अध्यापन पद्धती या विषयांचे अध्यापन केले जाणार आहे व विविध योग आसने शिकवले जाणार आहेत.

200 गुणांची लेखी व 100 गुणांची प्रात्यक्षिक अशी एकूण 300 गुणांची 12 क्रेडिटची अंतिम श्रेयांक परीक्षा घेतली जाते. सदर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना योगाच्या अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच योगामध्ये पुढील शिक्षणासाठी सदर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात एम.ए. योगा या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात सुद्धा प्रवेश घेता येईल.

योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रतिसाद

उत्तम आरोग्याविषयी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होने ही सकारात्मक बाब आहे. याचाच परिणाम म्हणून विद्यापीठाच्या योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रतिसाद वाढत आहे. या अभ्यासक्रमाच्या शिक्षणामुळे आरोग्याविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत होत असल्याचेही डॉ. दिपक माने यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleIND vs SL : टॅलेंट असूनही टीममध्ये संधी नाही, टीम इंडियात ‘हा’ खेळाडू राजकारणाचा ‘बळी’ !
Next Article खुशखबर ! भारतीय डाक विभागात 98 हजार जागांची भरती
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.