Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » रोहित पवार राजकारणात दंग; राम शिंदे मात्र जनतेसाठी सज्ज, कुकडीचे आवर्तन सोडण्याचा घेतला महत्वपूर्ण निर्णय..

रोहित पवार राजकारणात दंग; राम शिंदे मात्र जनतेसाठी सज्ज, कुकडीचे आवर्तन सोडण्याचा घेतला महत्वपूर्ण निर्णय..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 29, 2023Updated:July 29, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत तालुक्यातील खरिप पिंकाना जीवदान मिळणार आहे
कुकडी आवर्तन ची आवश्यकता आणि गरज लक्षात घेऊन प्रा .राम शिंदे यांनी ओव्हरप्लोचे आवर्तन सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. आणि तो त्यांनी सत्यात उतरवून दाखविल आहे, तिकडे midc वरून राजकारण चालू असताना मात्र आमदार प्रा. राम शिंदे हे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळाले, आणि त्यांचा शब्द खरा करून दाखविला आहे, सकाळी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार आज दिनांक 28/7/2023 रोजी संध्याकाळी कुकडी आवर्तन सोडण्याचे आदेश प्रा. राम शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता यांना दिले. शिरुर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

यामुळे कुकडी डावा कालवा ओव्हर फ्लो आवर्तन सोडण्याची मागणी प्रा राम शिंदे यांच्याकडून करत लगेच आवर्तन सोडण्यासाठी कार्यवाहीसह आवर्तन सोडण्याच्या निर्णय झाला. या वेळी कुकडी कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य काकासाहेब धांडे हे उपस्थित होते.

कुकडी खरिप आवर्तनाच्या अनुषंगाने कुकडी डावा कालवा व इतर कालवे सुरु करुन लाभक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पाणी देणे तसेच सिना, विसापूर व इतर मागणी येणारे तलाव भरुन देणे प्रस्तावित करणेत आले आहे. कुकडी प्रकल्पातील कालवे आवश्यकतेनुसार ओव्हरफ्लोच्या कालावधी व विसर्गाच्या मर्यादित भरण्याचे प्रस्तावित करणेत आले आहे.

कुकडी धरण श्रृंखंलेमध्ये ४६.७२ टक्के पाणी साठा झालेला आहे. यामध्ये वडज धरणाचा अप्पर गाईड कर्व्ह तसेच येडगाव धरणाच्या अप्पर गाईड कर्व्ह पर्यंत पाणी पातळी पोहचली आहे. चिल्हेवाडी व वडज धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग चालू आहे. व तो विसर्ग येडगाव धरणामध्ये येत आहे. डिंभे, माणिकडोह व पिंपळगाव जोगे धरणामध्ये अनुक्रमे ७५ टक्के, ५८ टक्के व ०९ टक्के एवढा साठा झालेला आहे. येडगाव धरण हे कुकड़ी श्रृंखलेमधील शेवटचे धरण आहे. तसेच या धरणाने अप्पर गाईड कर्व्ह गाठलेला असल्यामुळे त्या धरणाच्या सांडव्यावरून नदीमधे पाणी सोडणे अपेक्षीत आहे. सांडव्यावरून पाणी सोडत असताना कालव्याद्वारे पाणी सोडल्यास त्यातून विद्युत निर्मिती होऊ शकते.

त्यामुळे सहाजीकच कालव्याद्वारेही पाणी सोडणे अपेक्षीत आहे. या विषयाचे अनुशंगाने आज दि. २८/०७/२०२३ रोजी मंडळांतर्गत कार्यकारी अभियंतांची बैठक घेतली असता, “सध्या कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाऊस काही भागामध्ये झालेला आहे व अजुनही पाऊस चालू आहे. लाभक्षेत्रामध्ये सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता आहे. तसेच सिना, विसापूर सारखे धरण किंवा इतर छोटे लघु पाटबंधारे तलाव ज्यांनी अजून १०० टक्के पर्यंत पाणी पातळी गाठलेली नाही अशा धरणांमध्येही या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडता येऊ शकते असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आहे.

विसापूर धरणामध्ये मागील वर्षी पूराच्या काळामध्ये कुकडी डाव्या कालव्यामधून पाणी सोडल्यामुळे त्याचा नंतरच्या आवर्तनामध्ये फीडींग म्हणून पूरक उपयोग झालेला आहे. वरील सर्व पाणी पातळी, जलाशयातील पाणीसाठा व कुकडी डावा कालव्यातुन पाणी सोडणेबाबत मुख्य अभियंता यांचेशी चर्चा केलेली आहे व त्यांनी यास सहमती दर्शवलेली आहे. लाभक्षेत्रातील पर्जन्यमान कमी असलेल्या शिरुर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याने कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून प्रा. राम शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे इंद्रायणी पाणीपूरी चाट सेंटरचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न; आज पासून सेवेत
Next Article आमदार राम शिंदेंची लक्षवेधी अन नामकरणाचा प्रश्न निकाली; उपसभापतींनी केलं अभिनंदन, वाचा सविस्तर..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.