Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Startup| अहमदनगरच्या स्टार्टअपचा कृषी क्षेत्रात डंका; केंद्र सरकारकडून 18 लाख रुपये निधी प्रदान

Startup| अहमदनगरच्या स्टार्टअपचा कृषी क्षेत्रात डंका; केंद्र सरकारकडून 18 लाख रुपये निधी प्रदान

mahalokwaniBy mahalokwaniJuly 29, 2023Updated:July 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Startup स्टार्टअपचा कृषी क्षेत्रात डंका

अहमदनगर : तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील बायोमी टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या शेती-संशोधन करणाऱ्या संस्थेची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. या संस्थेने निर्मिती केलेल्या आणि शेतकर्यांना फायदेशीर असणाऱ्या ‘सोईलोमीटर’ या प्रोडक्टची स्टार्टअप Startup अंतर्गत निवड झाली आहे. राष्ट्रीय कृषी विस्तार योजनेतून या स्टार्टअप साठी 18 लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे.

राष्ट्रीय कृषी विपन्न संस्था नियम, जयपूर यांच्यामार्फत हा निधी देण्यात आला असून सदरच्या स्टार्टअपमध्ये Startup सोईलोमीटर हे कीट विकसित केले आहे. या सोईलोमीटर कीटच्या माध्यमातून शेतकरी बांधव स्वतः बांधावर मातीचे जैविक परीक्षण करू शकतील. तसेच कृषी निविष्ठांचा वापर आणि दर्जा याबाबतही शेतकरी बांधव सजग होऊ शकतील.

Flu Eye| महाराष्ट्रात डोळ्याच्या साथीचा फैलाव; ही लक्षणे दिसल्यास त्वरित करा हे उपचार.!

मातीचा जिवंतपणा तपासण्यासाठी कोणत्याही प्रयोगशाळेत न जाता, आपल्या शेताच्या बांधावर केवळ तीन तासात आणि तिनशे रुपयांत ही तपासणी करण्यासाठीचा ‘साॅईलोमीटर’ नावाचा संच विकसित करण्याचे काम डाॅ. प्रफुल्ल गाडगे यांनी केले आहे. बायोमी टेक्नाॅलाॅजीज या आपल्या स्टार्टअपच्या Startup माध्यमातून डाॅ गाडगे त्यांची उत्पादने आणि सेवा शेतकऱ्यांसाठी विकसित करीत असून राज्य सरकारांपासून ते विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना याबाबत ते सल्लागार म्हणून सेवासुद्धा पुरवत आहेत. या सोईलोमीटर कीटचे अनावरण केंद्रीय कृषीमंत्री. श्री. नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते झाले आहे. या कीटचा देशातील शेतकरी बांधवाना उपयोग होईल आणि हे कीट प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Table of Contents

  • Startup स्टार्टअपचा कृषी क्षेत्रात डंका

स्टार्टअपच्या Startup माध्यमातून मातीची पुनर्भरणा होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले आहे आणि शेतकऱ्यांनाही त्याबाबतचे पुरेसे ज्ञान नाही. याबाबत शासनाने साॅईल हेल्थ कार्डचा उपक्रम हाती घेतला आहे, मात्र यात जैविक तपासणी होत नाही आणि प्रयोगशाळेची गरज भासते तसेच त्यासाठी तीन दिवसांचा कालावधी आणि दहा हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. या प्रयोगशाळा मोठ्या शहरांमध्येच आहेत आणि सर्वसाधारण साॅईल टेस्टिंग लॅब्समध्ये या चाचण्या होतच नाही.

मग शेतकऱ्यांना हे सगळं कळणार कसं आणि जनजागृती कशी होणार? मातीतील अन्नद्रव्यांची तपासणी करून त्या अन्नद्रव्यांना पचविण्यासाठी, त्याची पिकासाठी योग्य उपलब्धता करून देण्यासाठी सूक्ष्म जिवाणूंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी आम्ही देशातलं पहिले असे मातीचा जिवंतपणा तपासण्याचं किट बनविले व त्याचे नाव साॅईलोमीटर असे ठेवले आहे. स्टार्टअपच्या Startup माध्यमातून साॅईलोमीटरद्वारे मातीचा जिवंतपणासह मायक्रोफ्लोरा किती आहे हे शेतकऱ्यांना समजेल व त्यातून मातीचे नियोजन करणे शक्य होईल. तसेच आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्लागार सेवा पुरवू शकू,” असे डाॅ गाडगे यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार राम शिंदेंची लक्षवेधी अन नामकरणाचा प्रश्न निकाली; उपसभापतींनी केलं अभिनंदन, वाचा सविस्तर..
Next Article जामखेड येथील कांदा अनुदानास अपात्र शेतकऱ्यांना न्याय देणार; सभापती शरद कार्ले यांचे पणन मंत्र्यांना पत्र..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.