Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तालुक्यातील शिऊर दलित वस्ती सुधार योजनेत मोठा अपहार; यांची चौकशी करा, जामखेड तहसीलदारांना निवेदन..

जामखेड तालुक्यातील शिऊर दलित वस्ती सुधार योजनेत मोठा अपहार; यांची चौकशी करा, जामखेड तहसीलदारांना निवेदन..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 31, 2023Updated:July 31, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

ग्रामसेविका व सरपंच यांची चौकशी करावी – पांडुरंग समुद्र

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार


आज रोजी जामखेड तहसील कार्यालय येथे जामखेड तालुक्यातील शिऊर येथे दलित सुधार योजने मार्फत आलेल्या निधीचा अपहार प्रकरणी शिवसेना सेल जामखेड तालुका दलित आघाडीचे उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.

Flu Eye| महाराष्ट्रात डोळ्याच्या साथीचा फैलाव; ही लक्षणे दिसल्यास त्वरित करा हे उपचार.!

याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील शिऊर येथे सन २०२१- २०२२ मध्ये ग्रामपंचायत ला दलित सुधार योजने अंतर्गत स्वच्छ भारत अभियान योजनेतून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या कामासाठी ९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.व गावात एल ई डी दिवे बसवण्यासाठी १ लाख ३० हजार निधी देण्यात आला होता,हि माहिती माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे.हा निधी दलित समाजासाठी आलेला असताना दलित वस्ती येथे कोठेही घनकचरा किंवा सांडपाणी व्यवस्थापन चे कोणतेही काम झालेले नाही.

Table of Contents

  • ग्रामसेविका व सरपंच यांची चौकशी करावी – पांडुरंग समुद्र

तत्कालीन ग्रामसेविका व सरपंच यांनी समाजाला विश्वासात न घेता इतर ठिकाणी निधी चा वापर केला आहे.त्यामध्ये ३ लाख खर्च केले असे दिसते.गावात व दलित वस्ती मध्ये कोठेही एल ई डी दिवे नवीन बसवले नाही, बऱ्याच ठिकाणी साधे बल्ब बसवण्यात आले आहेत.

. संबंधित ग्रामसेविका मॅडम यांची बदली झाल्यामुळे त्यांनी जाता – जाता गावातील कामे ग्रामसेविका व सरपंच यांनी बोगस कामे दाखवून बिले काढली आहेत व सहा ते सात लाख रुपयाचा अपहार केला आहे.संबधित ग्रामसेविका व सरपंच यांची चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करावे.

व त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी दलित समाज व शिऊर येथील ग्रामस्थामार्फत करण्यात येत आहे.अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने दि.०८/०८/२०२३ रोजी जामखेड तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसणार आहोत याची नोंद घ्यावी.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्तफा शेख (मेजर),शिवसेना सेल जामखेड तालुका दलित आघाडीचे उपप्रमुख पांडुरंग समुद्र, संचालक विठ्ठल चव्हाण,कृष्णा समुद्र, किशोर समुद्र, रणजित समुद्र, डॉ.नानासाहेब देवकाते, भिकू समुद्र,कचरु पुलावळे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या निवेदनावर बबन महादेव देवकाते, भिकू नारायण समुद्र,कचरु केरु पुलावळे, कुसूम भिकू समुद्र,प्रिया भगवान समुद्र, प्रकाश भिकू समुद्र,शितल प्रकाश समुद्र,बबई कचरु समुद्र,हिराबाई केरु समुद्र, मनिषा लक्ष्मण पुलावळे,लक्ष्मण कचरू पुलावळे, निकिता लक्ष्मण पुलावळे, विश्वास भगवान समुद्र,मिरा विश्वास समुद्र, रामभाऊ मारुती समुद्र, सुनील दिपक समुद्र,पुष्पा भगवान समुद्र, राहुल भगवान समुद्र, भगवान भाऊ समुद्र, कृष्णा विश्वनाथ समुद्र,सागर विश्वनाथ समुद्र,ललिता विश्वनाथ समुद्र, किशोर प्रभु समुद्र, संध्या किशोर समुद्र,छबाबाई प्रभु समुद्र, रणजित नवनाथ समुद्र, भगवान महादेव देवकाते, सिद्धेश्वर जगन्नाथ लटके, आकाश अभिमान निकम आदींच्या सह्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleModi Pune Visits : पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा; मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार का ? जाणून घ्या..
Next Article Annabhau Sathe | दीड दिवसाची शाळा ते साहित्यसम्राट; वाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जीवनगाथा..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.