Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला का असतो? त्यामागचं नेमकं लॉजिक तरी काय?

सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला का असतो? त्यामागचं नेमकं लॉजिक तरी काय?

mahalokwaniBy mahalokwaniDecember 17, 2022Updated:December 17, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल आहे. घराबाहेर पडतांना सर्वात आधी आपण मोबाइल सोबत घेतला आहे की नाही याची खात्री करून घेतो. म्हणजे मोबाइल आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झालाय. मात्र, सिमकार्ड शिवाय, मोबाईल म्हणजे, प्राणाविना देह.कितीही भारीचा फोन असला अन् त्यात सिमकार्ड नसेल तर त्या फोनचा काही उपयोग नाही. त्यामुळं मोबाइलमधील सिमकार्ड देखील खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय मोबाइल निरुपयोगी ठरतो. मात्र, हेच सिमकार्ड एका कोपऱ्यात का कापलेला असते यांचा कधी विचार तुम्ही केलाय का? याच विषयी जाणून घेऊ.


आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र, फोन वापरण्यासाठी दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे, ते म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि सिम कार्ड. सिम कार्ड नसेल तर तुम्हाला हँडसेटच्या माध्यमातून इतरांशी संवाद साधता येणार नाही. आज शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व गोष्टी स्मार्टफोनवर उपलब्ध आहेत. मात्र, या सर्व सेवांचा उपयोग करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड असणे गरजेचं आहे. मोबाईलमध्ये वापरल्या जाणार्‍या सिम कार्डची रुंदी २५ मिमी, लांबी १५ मिमी आणि जाडी ०.७६ मिमी असते.

हे सिम कार्ड तुम्ही निरखून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, या सिमकार्डचा एक कोपरा कापलेला असतो. मात्र, सुरुवातीच्या काळात सिम कार्डमध्ये कट केलेले डिझाइन नव्हते. मोबाइल फोनसाठी जेव्हा सिम कार्डचा उपयोग सुरू झाला, त्यावेळी याचे डिझाइन खूपच साधे होते. याला कोणत्याही प्रकारे कट केलेले नव्हते. मात्र, आता सिमकार्डला कट पाहायला मिळतात. सिमकार्डचा एक कोपरा कापलेला का असतो, हे समजून घेण्यासाठी सिमकार्ड ट्रेच्या रचनेविषयी माहिती करून घेणं आवश्यक आहे.


प्रत्येक मोबाईलमध्ये एक सिमकार्ड ट्रे असतो. हा ट्रे मोबाईलबाहेर काढता येतो. सिमकार्ड आणि हा ट्रे या दोघांचे डिझाईन एकमेकांना पूरक असतं. सिमकार्ड सेट करताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून या ट्रेचा एक कोपरा कापलेला असतो. या ट्रेचा थेट संबंध सिमकार्डचा काँटॅक्ट आणि मोबाईल कार्डहोल्डर पिनशी असतो. दुसरं म्हणजे, अनेकदा लोकांना सिम कार्ड मोबाइलमध्ये टाकतांना आणि काढतांना समस्या येत. या समस्येवर उपाय काढण्यासाठी सीम कार्ड बनवणाऱ्या कपन्यांनी त्याचा एक कोपरा कट करण्याचे ठरवलं. याच कारणामुळे मोबाइलच्या सीम कार्डचा एक कोपरा कट केलेला असतो.

याशिवाय, अनेकदा सीम कार्ड उलटे टाकल्यास फोन डीसेबल आहे असे दाखवते. हे लक्षात येण्यासाठीच सीम कार्डचा एक कोपरा कापलेला किंवा कट केलेला असतो. तसंच, सिम कार्डचा कोणता भाग उलटा आहे आणि कोणता भाग सरळ आहे, हे देखील अनेकदा लक्षात येत नसे. टेलिकॉम कंपन्यांच्या ही समस्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सिम कार्डच्या डिझाइनिंगमध्ये काही बदल केले. या कंपन्यांनी सिम कार्डच्या डिझाइनमध्ये केलेल्या बदलामुळेच आपल्याला याचा एक कोपरा कापलेला दिसतो.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleरितेश – जेनिलियाची ‘वेड’ लावणारी लव्हस्टोरी आहे, ‘या’ साऊथ सिनेमाची रिमेक कहाणी !
Next Article JALGAON | गुरे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.