Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » प्रा.मधुकर राळेभात सर्वसामान्य जनतेतील व्यक्तीमत्व- आमदार रोहित पवार

प्रा.मधुकर राळेभात सर्वसामान्य जनतेतील व्यक्तीमत्व- आमदार रोहित पवार

mahalokwaniBy mahalokwaniAugust 13, 2023Updated:August 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा मधुकर राळेभात यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

प्रा मधुकर राळेभात हे नेहमीच सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारे “व्यक्तिमत्त्व आहे, जेव्हा – केव्हा लोकांना अडचणी येतात राळेभात त्यांच्या बरोबर राहून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न पुर्वी पासुन करतात,शिक्षण विभागामध्ये शैक्षणिक जबाबदारी पार पाडताना सुध्दा शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

यावेळी वाढदिवसा प्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते. दिनांक ११ ऑगस्ट रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कर्जत/ जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांचा वाढदिवस शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील “पुढारी वड येथे आमदार रोहित पवार यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; वाढणार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या अडचणी.! किंमत फक्त..


पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले की,येणाऱ्या काळात सामाजिक, राजकीय, संघटनात्मक व अध्यात्मिक तसेच राळेभात हे हरि भक्त परायण म्हणजे च हभप आहेत त्यांचा पुढील ६० वा वाढदिवस मोठा कार्यक्रम घेवून धुमधडाक्यात साजरा करु व त्यांचे किर्तन आपण ऐकूया ,त्यांची वयाची १०० वा वाढदिवस अजून ४० वर्ष आहेत येणाऱ्या ४० वर्षात लोकांसाठी काम करतील.

सकाळी १०.०० वाजता जामखेड शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे ८ संताची मुर्ती ,श्री गणपती व विठ्ठल रुक्मिणी अशा १० मुर्तींची पूजा विविध समाज बांधवांच्या जोडपे तसेच प्रा. मधुकर राळेभात सप्त्नीक व अहमदनगर जिल्हा बँक चे संचालक अमोल राळेभात सप्त्नीक यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांची विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. गुरूवर्य हभप प्रकाश (महाराज) बोधले यांचे हरिकिर्तन झाले. या किर्तन ऐकण्यासाठी जामखेड तालुक्यातील सर्व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर प्रा.मधुकर राळेभात यांचा सत्कार करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर आलेल्या सर्व लोकांना सहकार महर्षी कै.जगन्नाथ (तात्या) राळेभात पाटील यांच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्हा बँक चे संचालक अमोल राळेभात यांच्या वतीने धोंडे जेवण देण्यात आले.हभप प्रकाश महाराज बोधले यांचे वतीने काही लोकांना गुरुदीक्षा देण्यात आले.व कार्यक्रम संपन्न झाला.तसेच नगरसेवक मोहन पवार यांनी तपनेश्वर येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला, खर्डा चौक येथे जामा मस्जिद येथे मुस्लिम व बौद्ध बांधवांनी तसेच मक्का मस्जिद येथे मुस्लिम बांधव, जैन बांधव आदी समाजातील बांधवातील सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला.


तालुक्यातील नागरिक, व्यापारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोबाईल वरून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.तसेच एस पी फिटनेस क्लबच्या वतीने संचालक सरफराज पठाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तालुक्यातील शिऊर येथे भगवान देवकाते यांनी प्रा मधुकर राळेभात यांचा वाढदिवस साजरा करत ५०० लोकांना शिपी आमटी चे जेवण देण्यात आले.

सायंकाळी हभप गाडे महाराज यांचे किर्तन झाले.यावेळी प्रा.मधुकर (आबा) राळेभात यांच्या निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खा. जोगेंद्र कवाडे या दिवशी अहमदनगर जिल्हाच्या दौऱ्यावर..
Next Article Mobile Sale| एस. एस. मोबाईलचा १५ ऑगस्टला बिग फ्रीडम सेल..!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.