Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed | जामखेड येथील कै. विष्णू उस्ताद काशीद भव्य निकाली कुस्तीचा मानकरी ठरला सोलापूरचा समीर शेख; या नामंकित मल्लाचा पराभव

Jamkhed | जामखेड येथील कै. विष्णू उस्ताद काशीद भव्य निकाली कुस्तीचा मानकरी ठरला सोलापूरचा समीर शेख; या नामंकित मल्लाचा पराभव

mahalokwaniBy mahalokwaniAugust 24, 2023Updated:August 24, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


जामखेड चे ग्रामदैवत नागेश्वर यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षही कैलासवासी विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजक तथा भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद यांच्या वतीने लना होषिंग या ठिकाणी दिनांक 22 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.

जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार

महाराष्ट्र बाहेरील पैलवान यांनी या आखाड्यास हजेरी लावली


जामखेड ची नागपंचमी महाराष्ट्रात वेगळ्या अर्थाने परिचित होती परंतु गेल्या अनेक वर्षंपासून कैलासवासी विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या समरणार्थ उप महाराष्ट्र केसरी बबन काका काशीद, मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद यांनी ही जुनी ओळख पुसून कुस्तीच्या माध्यमातून एक नवी ओळख महाराष्ट्राला करून दिली


    महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील पैलवान यांनी या आखाड्यास हजेरी लावली आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिला कुस्तीगीर यांनी देखील हजेरी लाऊन आखाड्यात एक वेगळी रं गत आणली, अनेक देखण्या कुस्त्या यानिमित जामखेड करणा पाहायला मिळाल्या नागपंचमी निमित्त एक वेगळी पर्वणी अनुभवायला मिळाली. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या कुस्त्या रात्री 9 वाजेपर्यंत चालू होत्या विशेष म्हणजे कुस्ती शौकिनांची गर्दी उल्लेखनीय होती आणि आणखी महत्वाची बाब म्हणजे अनेक महिला भगिनी कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

    HSc Board Exam बारावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळेस? विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

    [better-ads type=’banner’ banner=’6874′ ]


    अजय दादा काशीद मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते या बरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम याठिकाणी राबवण्यात येतात यावर्षी अर्जुन पुरस्कार विजेते राहुल आवारे तसेच आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले ले सुजय तनपुरे यांचा सन्मान, मराठी भाषिक संघ अध्यक्ष इंदोर सौ.स्वातीताई काशीद आणि मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांनी इंदोर या ठिकाणी 9.5 फुटी जिजामाता प्रतिमा सिंदखेड राजा ते इंदोर पदयात्रा काढून बसवली त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला,लना होशिग शाळेसाठी क्रीडा साहित्य, जिजामाता पुस्तकाच्या सर्व शाळांसाठी तीन हजार प्रती वितरण करण्यात आल्या.

    [better-ads type=’banner’ banner=’6832′ ]


    कैलासवासी विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजक अजय दादा काशीद यांच्या वतीने दर वर्षी जामखेड येते आयोजित करण्यात येते आणि या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोसाहन मिळत असते यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने अजय काशीद यांचे विशेष आभार मानले जात आहेत. कार्यक्रमासाठी परमपूज्य संत श्री 1008 महामंडलेश्वर दादुजी महाराज शनी पुत्र इंदोर, महादेवा नंद भारती महाराज , प्रेमानंद महाराज, शिवाजी महाराज येवले, अहिल्या देवीचे वंशज दीपक शिंदे,स्वप्नील गौड इंदोर, अक्षय भैय्या, लोकेश वर्मा, सागर धस, डॉक्टर भगवान मुरूमकर, सोमनाथ पाचर्णे, शरद कार्ले , गौतम उतेकर, आदी जन उपस्थित होते.


    अनेक दैदिप्यमान अश्या कुस्त्या यावेळी जामखेड कराणी पहिल्या यामधे सौरभ गाडे आणि अविनाश शेटे यांच्यात अविनाश शेटे विजयी झाले, विशाल माने सांगली आणि विजय पवार पुणे ही कुस्ती बरोबरीत सोडण्यात आली तसेच नंबर एकची कुस्ती समीर शेख सोलापूर आणि युवराज चव्हाण नगर यांच्यात होऊन समीर शेख विजयी झाला.या कुस्तीचा मान आणि बक्षीस आमदार राम शिंदे साहेब यांचा होता.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय दादा काशीद यांनी तर आभार नारायण राऊत यांनी मानले.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleHSc Board Exam बारावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळेस? विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
    Next Article Rohit Pawar : रोहित पवारांचा मुश्रीफांवर घणाघात; मोदींसाठी तुम्ही बाप मानणाऱ्या शरद पवारांना विसरले..
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.