Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar : रोहित पवारांचा मुश्रीफांवर घणाघात; मोदींसाठी तुम्ही बाप मानणाऱ्या शरद पवारांना विसरले..

Rohit Pawar : रोहित पवारांचा मुश्रीफांवर घणाघात; मोदींसाठी तुम्ही बाप मानणाऱ्या शरद पवारांना विसरले..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 24, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Rohit Pawar : भाजपने (BJP) राज्यात पक्ष फोडले, घरे फोडली. अशा प्रवृत्तीच्या मुळावरच घाव घालणे आवश्यक असल्याचे सांगत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर हल्‍लाबोल केला. राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी (ता. २५) दसरा चौक येथे सभा होत आहे.

या सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्‍हा दौऱ्या‍वर आलेल्या रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणारे व ते विचार अंमलात आणणारे शहर म्‍हणून कोल्‍हापूरची ओळख आहे. ऐतिहासिक दसरा चौकातून राज्याला व देशाला पुरोगामी संदेश देण्यासाठीच शरद पवार यांनी या मैदानाची निवड केली असेल.

Sharad Pawar । ‘मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून ठोकून काढा’, शरद पवारांचे स्फोटक बोल..

भाजपकडून जे फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, त्यावर उध्‍दव ठाकरे गेली वर्षभर बोलत आहेत. मात्र शरद पवार पहिल्यापासून भाजपच्या या नितीवर टीका करत आहेत. शरद पवारांना ७० पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नसल्याचे वक्‍तव्य पुण्यातील एका नेत्यांनी केले आहे. त्याचे आश्‍‍चर्य वाटते. हेच नेते आजूबाजूला होते. त्यामुळेच कदाचित ७० पेक्षा जास्‍त आमदार निवडून आणता आले नसतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Rohit Pawar म्हणाले पवारांची ताकद का वाढवली नाही?

‘एक मंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद वाढवण्यासाठी गेल्याचे सांगत आहेत. मग शरद पवार यांची ताकद का वाढवली नाही’, असा सवाल आमदार Rohit Pawar यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता विचारला.

खासदार शरद पवार यांचा दौरा असा

शुक्रवारी (ता. २५) दुपारी २ वाजता सातारा येथून कोल्‍हापूरकडे प्रयाण. दुपारी साडेचार वाजता तावडे हॉटेल येथे पोहोचल्यानंतर तेथून ताराराणी चौकापर्यंत मोटरसायकल रॅलीने आगमन. हॉटेल पंचशील येथून दसरा चौक येथील सभेकडे ५ वाजून १५ मिनिटांनी प्रयाण. सभास्‍थळी ५.३० वाजता आगमन व रात्री हॉटेल पंचशील येथे मुक्‍काम.

शनिवारी सकाळी साडे नऊ ते ११ या वेळेत शिष्‍टमंडळांच्या भेटीगाठी, ११ ते ११.३० या वेळेत पत्रकार परिषद, १२ वाजता शाहू महाराज समाधीस्‍थळास भेट, १ ते २ या वेळेत जिल्‍हाध्यक्ष व्‍ही. बी. पाटील यांच्या निवासस्‍थानी राखीव, ३.३० ते ५.३० हिंद मजदूर सभा अधिवेशनास उपस्‍थिती (महासैनिक दरबार हॉल) व ६ वाजता पुण्याकडे प्रयाण.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleJamkhed | जामखेड येथील कै. विष्णू उस्ताद काशीद भव्य निकाली कुस्तीचा मानकरी ठरला सोलापूरचा समीर शेख; या नामंकित मल्लाचा पराभव
    Next Article Shivsena| जामखेड तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करणार; जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.