धनराज पवार: जामखेड प्रतिनिधी
श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त,मोरे वस्ती श्रीकृष्ण नगर जामखेड येथे संगीत भागवत कथा चे आयोजन करण्यात आले आहे जामखेड शहरात एकमेव असलेले श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी गुरुवार दिनांक 31-8 -2023 ते बुधवार 6 -9- 2023 या कालावधीत सायंकाळी ६ ते ९या वेळेत संगीत भागवत कथा चे आयोजन करण्यात आलेले आहे
[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]
संगीत भागवत कथाकार ह भ प दयाल चैतन्य प्रभू यांच्या सुश्राव्य वाणीने होणार आहे तरी भाविक भक्तांनी संगीत भागवत कथेचा लाभ घ्यावा बुधवार दिनांक 6 -9- 2023 दुपारी ४ते६या वेळेत महिला मंडळाचे भजन होईल तसेच ९ ते १२ श्रीकृष्ण कथा अभिषेक व श्रीकृष्ण जन्म होईल तसेच रात्री १२ ते १२:३० श्रीकृष्ण जन्म व पाळणा गीत होईल

गुरुवार दिनांक 7 -9- 2023 सकाळी 9 ते 12 ह भ प दयाल चैतन्य प्रभू यांचे काल्याचे किर्तन होईल दुपारी बारा वाजता दहीहंडी कार्यक्रम होईल त्यानंतर १२:०५ ते ३ वाजता पर्यंत सार्वजनिक महाप्रसाद होईल सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्रीकृष्ण मंदिर उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे
