Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार रोहित पवार यांनी घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

आमदार रोहित पवार यांनी घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

mahalokwaniBy mahalokwaniAugust 30, 2023Updated:August 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत/ जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये यंदाच्या वर्षी सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाऊस नसल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळत आहेत याशिवाय पशुधनही पाणी व चाऱ्याअभावी ग्रस्त आहे.

चारा छावण्या व पाण्याचे टँकर सुरू करण्याचीही आ. रोहित पवार यांची मंत्र्यांना विनंती

हे पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्यांची अतिशय गरज आहे तसेच पशुधन आणि नागरिकांनाही पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने पाण्याचे टँकरही चालू करण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषि विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे.

सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये राज्यातील १७ जिल्ह्यांतील २९७ महसूल मंडळांमध्ये पावसात २१ दिवसापेक्षा जास्त खंड पडलेला आहे. यामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघाचाही समावेश असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. येथील शेतकऱ्यांनी तूर, कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ७ वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत ५० टक्के घट अपेक्षित असावी व त्याअनुषंगाने राज्यशासन, विमा कंपनी आणि शेतकरी प्रतिनिधी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संयुक्त सर्वेक्षण करतील व त्याच्या अहवालानुसार येणाऱ्या नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

त्यामध्ये कर्जत तालुक्यातील कर्जत, मिरजगाव, माही, राशिन, भांबोरा व कोंभळी आणि जामखेड तालुक्यातील जामखेड, अरणगाव,खर्डा,नायगाव व नान्नज या महसूल मंडळांचा समावेश असून त्यांचे सर्वेक्षणही पूर्ण झाले असून अहवाल व प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आलेले आहेत. सदरील प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदयांना केली आहे. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंतीही त्यांनी पत्राद्वारे प्रत्यक्ष भेटून केली आहे.

प्रतिक्रिया : आमदार रोहित पवार

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मतदारसंघात विमा कसा घेता येईल यासाठी अधिकारी व आम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. आणि आज नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नाव आहे. आता खऱ्या अर्थाने परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे ईथे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे त्वरित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती(Mid Season Adversity) अंतर्गत नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के रक्कम मिळावी अशी विनंती मंत्री महोदयांना केली व चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर हे लवकरात लवकर चालू करावे अशी देखील विनंती केली आणि सरकारची मदत मिळेपर्यंत आम्ही खासगी टँकरने जसे आतापर्यंत पाणी देत आहोत तसेच यापुढेही टँकरने नागरिकांना पाणी पोचवत राहू, असे देखील त्यांना सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAsia Cup Ind vs Pak : भारत पाकिस्तान सामना या दिवशी होणार ; टीम इंडियाला मोठा धक्का हा खेळाडू 2 सामन्यांमधून बाहेर
Next Article 1September Rules: सप्टेंबरपासून या नियमात बदल; ही कामे आजच पूर्ण करा नाहीतर, येतील या अडचणीं
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.