Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तालुक्याचा शिक्षण विभागात डंका; श्री. लक्ष्मीकांत इडलवार यांना राज्य सरकारचा आदर्श पुरस्कार जाहीर – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे…

जामखेड तालुक्याचा शिक्षण विभागात डंका; श्री. लक्ष्मीकांत इडलवार यांना राज्य सरकारचा आदर्श पुरस्कार जाहीर – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे…

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 2, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिल्या जाणाऱ्या 2022-23वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.


यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव शाळेतील आदर्श, तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री.लक्ष्मीकांत एकनाथराव ईडलवार सर यांना या वर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जामखेड तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.


मागील सोळा वर्षाच्या शैक्षणिक सेवेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सातत्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ केली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक लेख,विविध शालेय व सहशालेय उपक्रम,तसेच शासनाच्या विविध पोर्टलवर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती,राष्ट्रीय स्तरावरच्या विविध शैक्षणिक कार्यशाळेमध्ये सहभाग,विभागीय शिक्षणाच्या वारीमध्ये स्टॉल मांडणी व सादरीकरण, फिरते बाल वाचनालय,पक्षांची खानावळ,दीक्षांत समारंभ,सेल्फी विथ सक्सेस,एक कुटुंब एक कुंडी,मी ज्ञानी होणार ,कवींची भेट नायगावहून थेट, प्राचीन युद्धकला ,संगीतमय लेझीम यासारखे आनंददायी व नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने शाळेत राबवून शाळेच्या सर्वांनी विकासासाठी हातभार लावला.

तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करून शालेय वातावरण निर्मिती केली.या सर्व शैक्षणिक कार्यासाठी गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब,विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख ,मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले
याबद्दल जामखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा. श्री.बाळासाहेब धनवे साहेब ,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती नायगाव ,ग्रामस्थ पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने; जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे..
Next Article Jalana| जालना घटनेचा निषेध;आमच्या आंदोलन कर्त्या आई बहीण वर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध – पै. हवा सरनोबत
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.