रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशावरून पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी शशिकलाताई वाघमारे यांची निवड करण्यात आल्याचे पत्र पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांनी निवडीचे पत्र दिले असून त्यांच्या निवडीचे स्वागतचे केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेबांनी दूरध्वनी वरून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेततसेच पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देऊन सर्व जातीसर्व जाती-धर्माच्या महिलांना न्याय देण्याचे व पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्याचे आदेश दिले आहेत.

प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड प्रदेश सचिव परशुराम वाडेकर पुणे जिल्ह्याचे पक्षाचे नेते बाळासाहेब जानराव रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष संगीता आठवले आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी शशिकला वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे

शशिकला वाघमारे यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास दलित पॅंथर ते रिपब्लिकन पक्ष असा असूनांनी आजपर्यंत अन्य अत्याचाराच्या विरुद्ध शेकडो आंदोलने केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा घेऊन केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना साहेबांच्या आदेशानुसार नमस्ते महाराष्ट्र मध्ये तसेच पुणे शहरामध्ये महिलांचे मोठे संघटन निर्माण करून पक्षाची ताकत वाढविण्याचे काम केले आहे त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांचे संघटन वाढवून महिलांच्या न्याय हक्कासाठी आठवले साहेबांच्या आदेशानुसार काम करणार असल्याची त्यांनी अभिवचन दिले आहे त्यांच्या निवडीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
