जामखेड-जामखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेल्या असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती. संगिता गिरी यांचा जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की,श्रीम गिरी मॅडम यांनी अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून जिद्द व मेहनीतीच्या जोरावर कष्टाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.त्यानंतर त्यांना प्रमोशन मिळून सहाय्यक पोलीस निरीक्षक झाल्या हि खरंच अभिमानाची गोष्ट असून इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी डॉ.संजय भोरे, केंद्रप्रमुख श्री सुरेश मोहिते,श्री बाळासाहेब कुमटकर पाटोदा शाळेचे मुख्याध्यापक श्री खवले,पत्रकार श्री धनराज पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
