अ.नगर – येथील रोटरी क्लब ऑफ अहमदनगर संचलित रोटरी पीस सेंटर अर्थात रोटरी शांती केंद्राची स्थापना आज 21 सष्टेंबर 2023 आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचे औचित्य साधुन करण्यात आली व तणावमुक्त जीवनावर न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष माधवराव देशमुख यांनी दिली ते पुढे म्हणाले की रोटरीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष Gordon Mcinally व डिस्ट्रीक्ट 3132 च्या प्रांत अध्यक्ष स्वाती हरकल यांच्या प्रेरणेने आम्ही देशातील पहिल्या रोटरी पीस सेंटरची स्थापना केली आहे याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ गौरी स्पर्धेचे आयोजन;आकर्षक बक्षिसे
‘तणावमुक्त जीवन’ या विषयावरील कार्यशाळा रोटरी पीस सेंटर व न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाली. यात सुप्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ व साईदीप हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस एस दिपक व राजयोगा मेडिटेशनच्या अभ्यासक व ऑफ अहमदनगरच्या माजी अध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया यांनी मार्गदर्शन केले. डॉ. दिपक यांनी आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाच्या शुभेच्छा देत जगात शांतता नांदली पाहिजे व त्याची सुरूवात स्वत: पासुन केली पाहिजे असे सांगितले. ते पुढे म्हणाले की रोटरीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असुन काळाची गरज आहे. सध्या जगामध्ये डिप्रेशन व आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे ते जर वेळीच थांबविले नाही तर जगाला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल असे सांगुन डॉ. दिपक यांनी डिप्रेशन व आत्महत्या होण्याची विविध कारणे व उपाय योजना याविषयी स्पष्टीकरण केले. मन मोकळे करण्यासाठी मित्र, नातेवाईक यांनी भावनिक आधार देण्याची आवश्यकता आहे. पैशा पेक्षा आपलेपणाची भावना अधिक महत्वाची आहे असे ते म्हणाले.
डॉ. सुधा कांकरिया यांनी तणाव निर्माण होण्याची कारणे सांगुन त्याचे निवारण करण्याच्या विविध विधी समजावुन सांगितल्या. आज प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळया ताणतणावाला सामोरे जावे लागते. पण टेन्शन घालविण्यासाठी मनशक्ती वाढविली पाहिजे. त्यासाठी मोबाईलला जसे चार्ज करतो तसे मनाला चार्ज करण्याची आवश्यकता आहे. मनाला चार्ज करण्यासाठी सकारात्मक व दिव्य विचारांची आवश्यकता आहे. ‘जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे’ ‘हार के भी ना हारे जित उसीकी होती है’ हे दोन सिध्दांत डॉ. सुधाताईंनी उदाहरणासहित स्पष्ट करीत मनाची शक्ती वाढविण्यासाठी आणि मन चार्ज करण्यासाठी राजयोगा मेडिटेशनचा प्रॅक्टीकल अभ्यास करून घेतला.
प्रा.डॉ. बाळासाहेब सागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना राजयोगा मेडिटेशन कोर्स मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. आपला देश तरूणाईचा देश म्हणून ओळखला जातो. तुम्ही तरूण वर्ग मनाने खंबीर व शक्तीशाली असाल तर तुम्हाला कुठलाही ताणतणाव होणार नाही आज डिप्रेशन व आत्महत्येचे वाढते प्रमाण पहाता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज ‘तणावमुक्त जीवन’ या अत्यंत महत्वपुर्ण कार्यशाळेतुन विद्यार्थ्यांना मनशक्ती वाढवुन तणावमुक्त जीवन जगण्याच्या अनेक विधी अवगत झाल्या या बद्दल मी संयोजकांचे आभार मानतो.
रोटरीचे माजी अध्यक्ष नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी तणावमुक्त जीवन कोर्स हा संपूर्णत: मोफत असुन त्यासाठी 9423165414/9850887838 येथे संपर्क करण्याची विनंती केली. सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शेवटी रोटरीचे सचिव दिपक गुजराथी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबच्या सौ नेहा जाधव, सौ. अनघा राऊत, न्यु आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य झावरे सर, श्री गांगुर्डे सर, भारती मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
देशातील पहिल्या रोटरी पीस सेंटरच्या पिस कमिटीमध्ये डॉ. सुधा कांकरिया, डॉ. एस एस दिपक, माधव देशमुख, दिपक गुजराथी, डॉ. रविंद्र साताळकर, निलेश वैकर, पुरूषोत्तम जाधव, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. दादासाहेब करंजूले, जवाहर मुथ्था, नेहा जाधव, अनघा राऊत, साधना देशमुख हे कार्यरत असुन प्रांतपाल स्वाती हेरकल, माजी प्रांतपाल शिरीष रायते, माजी प्रांतपाल प्रमोद पारिख हे मार्गदर्शक म्हणून काम पहात आहेत. देशातल्या या पहिल्या रोटरी पीस सेंटरचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
