Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar यांचा वाढदिवस; मतदारसंघातील गरजू महिलांसाठी निर्धूर चुल वाटप कार्यक्रमाचे आयोजन

Rohit Pawar यांचा वाढदिवस; मतदारसंघातील गरजू महिलांसाठी निर्धूर चुल वाटप कार्यक्रमाचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 27, 2023Updated:September 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेडचे आमदार Rohit Pawar यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघासह परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच ‘शाश्वत जगाची निर्मिती’ या प्रकल्पांतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील गरजू महिलांना निर्धुर चूल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत कर्जत व जामखेड मधील दोन हजाराहून अधिक ग्रामीण भागातील गरजू महिलांना निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले.

Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर..

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयआय केअर फाउंडेशन व कॅपजेमिनी यांच्या मदतीने आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून ‘शाश्वत जगाची निर्मिती’ या प्रकल्पाअंतर्गत गरजू महिलांना दोन्ही तालुक्यात स्वतंत्रपणे कार्यक्रम ठेवून निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार, सौ.सुनंदाताई पवार यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून आय.आय केअर फाउंडेशनचे संचालक डॉ. संतोष भोसले तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविताताई व्होरा यांची देखील उपस्थिती होती.

तब्बल २ हजार लाभार्थी महिलांना निर्धुर चुलीचा होणार फायदा

ग्रामीण भागातील तीन दगडाची चूल व मातीची चूल या चुलीमुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असतो. त्यानुसार फुफुसांचे आजार, श्वसनाचे आजार, डोळ्याचे आजार देखील यामधून होण्याचा मोठा धोका संभवतो. परंतु निर्धूर चुलीमुळे 60 ते 70 टक्के धूर कमी होत असल्याने महिलांच्या आरोग्यावर होणारा घातक परिणाम देखील कमी होण्यास मदत होईल, यासोबतच निर्धूर चुलीला लागणारे सरपन हे बाकीच्या चुलीच्या प्रमाणापेक्षा 50% कमी लागते आणि सरपण कमी लागत असल्यामुळे वृक्षतोडही कमी होईल आणि यामुळे पर्यावरणावर त्याचा विघातक परिणाम होणार नाही. ग्रामीण भागातील गरीब महिलांना या निर्धूर चुलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयआय केअर फाउंडेशन व कॅपजेमिनी यांच्या मदतीने आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून ‘शाश्वत जगाची निर्मिती’ या प्रकल्पाअंतर्गत गरजू महिलांना दोन्ही तालुक्यात स्वतंत्रपणे कार्यक्रम ठेवून निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार, सौ.सुनंदाताई पवार तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आय.आय केअर फाउंडेशनचे संचालक डॉ. संतोष भोसले तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविताताई व्होरा उपस्थित होत्या.

यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, माजी सभापती सुर्यकांत मोरे, राहुल बेदमुथा,सरचिटणीस प्रकाश काळे,नगरसेवक अमित जाधव, रमेश आजबे,माजी सरपंच नरेंद्र जाधव, ॲडव्होकेट हर्षल डोके, बापूसाहेब कार्ले, हनुमंत पाटील,शरद शिंदे, रामहरी गोपाळघरे,अमर चाऊस,गणेश चव्हाण,प्रदीप कात्रजकर, प्रशांत हिरवे, इमरान तांबोळी आदी सरपंच सौ.अंजलीताई ढेपे,वैशालीताई शिंदे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleडॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले – सौ.सुनंदाताई पवार
Next Article जामखेड आयकॉन सिटी गणेश मंडळांच्या महाआरतीचा बहुमान दिलीप गुगळे यांना; विविध स्पर्धेचे आयोजन..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.