कर्जत / जामखेड चे लोकप्रिय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ ,’ नंतर आता ‘ काळीज ‘ म्हणून मतदार संघातील जामखेड शहरात बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे.
पहिल्यांदाच विक्रमी मताधिक्याने आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री नंतर आता ‘ काळीज’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आ. रोहित दादा पवार यांचा दि २९ सप्टेंबर २०२३ रोजी वाढदिवस आहे. अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख ‘ आमचं काळीज’ असा करण्यात आला आहे.पक्षाची मोठी जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्या वर असून मतदार संघातील तसेच राज्यातील युवकांच्या प्रश्नासाठी लढणारा लढवय्या नेता म्हणून आज रोजी त्यांच्या कडे पाहिले जाते.
🔳 प्रतिक्रिया मा. प्रल्हाद डिसले (सर)
“आज मतदार संघातील विविध विकास कामे तसेच राज्यातील युवकांना व जनतेला आपलासा तसेच मतदार संघातील अडचणी दूर करण्यासाठी सतत प्रयत्न वादी असणारा म्हणजे नेता म्हणजेच ‘ आमचं काळीज ‘ आमदार रोहित (दादा) पवार
