ICC world Cup 2023 भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना आज होणार असून वर्ल्ड कपमध्ये कोणता संघ विजयाचा श्रीगणेशा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ICC world Cup 2023
ICC world Cup 2023 वर्ल्ड कप २०२३ चा थरार थोड्याच वेळात सुरु होणार आहे , भारत-ऑस्ट्रेलिया याचा वर्ल्ड कप २०२३ मधील आमने सामने येण्याचा ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात एकूण 12 वेळा भिडले आहेत. इथेही ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात भारताचा पराभव केला आहे.

ICC world Cup 2023 वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याला काही वेळात सुरुवात होणार आहे. चेन्नईमधील चिदंबरम स्टेडिअममध्ये हा सामना होणार असून भारताच्या मिशन वर्ल्ड कपला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच वन डे वर्ल्ड कप आहे. दुसरीकडे पाच वेळा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलिया संघाचं तगडं आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघामध्ये कोणाला स्थान मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
Table of Contents
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.