Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण न दिल्यास जामखेड तालुक्यात साखळी उपोषण; तहसील समोर प्रत्येक दिवशी एक गाव

मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण न दिल्यास जामखेड तालुक्यात साखळी उपोषण; तहसील समोर प्रत्येक दिवशी एक गाव

mahalokwaniBy mahalokwaniOctober 24, 2023Updated:October 24, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सपाटी जि .जालना या ठिकाणी सभा घेऊन कोट्यावधी मराठा समाजाच्या साक्षीने शासनास 24 तारखेपर्यंत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे व मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण द्यावे अशी विनंती केली होती

उद्या 24 तारखेला ही मुदत संपत आहे. 24 तारखेला तारखेला जर मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला नाही तर दिनांक 25 ऑक्टोबर पासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून राज्यात प्रत्येक तालुक्यात साखळी उपोषण केले जाणार आहे.

त्याप्रमाणे नियोजन म्हणून जामखेड तालुक्यातील सर्व गावे जामखेड तहसील कार्यालयासमोर दररोज एक गाव याप्रमाणे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार आहेत.सदरील उपोषण शांततेच्या मार्गाने व कसलाही हिंसात्मक प्रकार न करता तहसील कार्यालयाची परवानगी घेऊन होणार आहे. यासाठी बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी जामखेड शहर, गुरुवार 26 ऑक्टोबर रोजी लेहनेवाडी , शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी जांबवाडी, शनिवार 28 ऑक्टोबर रोजी सावरगाव , रविवार 29 ऑक्टोबर रोजी भुतवडा याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील गावे नियोजनाप्रमाणे दररोज येऊन जामखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत.

तरी वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जामखेड शहर व दिलेल्या गावातील मराठा बांधव दररोज तहसील कार्यालय या ठिकाणी साखळी उपोषणासाठी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.

तसेच कोणीही सदर कालावधीमध्ये हिंसात्मक प्रकार करू नये, साखळी उपोषण शांततेच्या मार्गाने करावे व कोणत्याही मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नयेत असेही आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीला मिळणार नवे शिलेदार..?
Next Article आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जामखेड नगरपरिषदेसाठी 5 कोटींचा निधी मंजुर, दसऱ्याच्या मुहूर्तावर जामखेडकरांना मिळाले मोठे गिफ्ट
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.