Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » INDvsSA | पावसाची जोरदार ‘बॅटिंग’; भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द

INDvsSA | पावसाची जोरदार ‘बॅटिंग’; भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द

mahalokwaniBy mahalokwaniDecember 10, 2023Updated:December 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
INDvsSA
INDvsSA
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

IND vs SA 1st T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ अशा विजयानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. आफ्रिकेच्या (INDvsSA) उसळत्या खेळपट्ट्यांवर भारताच्या युवा ब्रिगेडची खडतर कसोटी लागणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ डोळ्यासमोर ठेवताना युवा खेळाडूंना पुन्हा आपली छाप पाडण्याची संधी आहे. पण, आजच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि सामना रद्द करावा लागला.

जगात ‘मेलोडी’ची हवा; मोदींना ‘फ्रेण्ड’ म्हणणाऱ्या जॉर्जिया मेलोनींचा चीनला मोठा झटका

दरम्यान, T20 विश्वचषक 2024 यावेळी परदेशी भूमीवर खेळवला जाईल. या विश्वचषकापूर्वी भारताला फक्त 5 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. यापैकी टीम इंडिया अफगाणिस्तानसोबत मायदेशात तीन सामने खेळणार आहे. अफगाणिस्तानचा संघ जानेवारी 2024 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. जिथे उभय संघांमध्ये तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे.

Not so great news from Durban as the 1st T20I has been called off due to incessant rains.#SAvIND pic.twitter.com/R1XW1hqhnf

— BCCI (@BCCI) December 10, 2023

रोहित आणि विराट T20 विश्वचषकात खेळणार ?

दुसरीकडे, बीसीसीआयलाही टी-20 विश्वचषकापूर्वी धाकड टीम इंडिया तयार करायची आहे. कारण गेल्या एक वर्षापासून रोहित शर्मापासून विराट कोहली आणि केएल राहुलपर्यंत संघातील वरिष्ठ खेळाडूंनी एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली 2024 च्या T20 विश्वचषकात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भारतीय युवा खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत

दरम्यान, टीम इंडियातील युवा खेळाडू सध्या शानदार फॉर्ममध्ये दिसत आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियासोबत खेळलेल्या टी-20 मालिकेत युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने प्रभावित केले. विशेषतः फलंदाजीत भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली. आता पुन्हा एकदा (INDvsSA) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव फलंदाजीपासून कर्णधारपदापर्यंत कमाल करत आहे.

Table of Contents

  • रोहित आणि विराट T20 विश्वचषकात खेळणार ?
  • भारतीय युवा खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRBIआरबीआयने फोन पे आणि गुगल पे व्यवहाराची वाढवली मर्यादा; पहा किती रक्कम पाठवू शकतो..
Next Article Rohit Pawar | रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला आक्रमक; नागपुरात तणावाची परिस्थिती
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.