Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar | रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला आक्रमक; नागपुरात तणावाची परिस्थिती

Rohit Pawar | रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला आक्रमक; नागपुरात तणावाची परिस्थिती

mahalokwaniBy mahalokwaniDecember 12, 2023Updated:December 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Rohit Pawar रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा ही राज्यभरात 800 किमीचा प्रवास करुन आज नागपुरात दाखल झाली. रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पायी चालत 400 गावांमधून ही युवा संघर्ष यात्रा केली. त्यांच्या या यात्रेचा समारोप आज नागपुरात झाला. नागपुरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाषण केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांनी भाषण केलं. त्यानंतर रोहित पवार यांची ही युवा संघर्ष यात्रा थेट विधान भवनाच्या दिशेला निघाली.

maruti suzuki swift मारुती सुझुकी स्विफ्टची क्रेज कायम; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Rohit Pawar रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा

नागपुरात विधान भवन परिसरात आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मोर्चा निघाला. पण पोलिसांनी त्यांना अडवलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली. रोहित पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा नागपुरात विधान भवनाजवळ धडकली. रोहित पवार यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते परिसरात दाखल झाले. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना अडवलं. पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले. पण कार्यकर्त्यांकडून बॅरिकेट्स तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला गेला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा झिरो माईल चौकावर पोहोचला. कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. तर पोलीसही सतर्क झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला. पोलिसांनी रोहित पवार यांनाही अडवलं आहे.

कार्यकर्त्यांना अडवलं
राष्ट्रवादीचे इतक्या मोठ्या संख्येतले कार्यकर्ते विधान भवनच्या दिशेला येत असल्याचं पाहिल्यानंतर पोलीस सतर्क झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झाला. पोलिसांनी बॅरिकेट्स लावत कार्यकर्त्यांना अडवलं. कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटीलही सहभागी झाले. पोलिसांनी रोहित पवार यांना रोखलं. तसेच काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांकडून धरपकड सुरु झाल्यानंतर रोहित पवार यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

Table of Contents

Rohit Pawar रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा

यावेळी माध्यमांनी रोहित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अरे हे सामान्य लोकांना सोडच नाहीत. “लाठीचार्ज करतात. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करतात. अरे शेतकऱ्यांची मुलं आहेत. गरिबाची मुलं आहेत. त्यांना तुम्ही लाठीचार्ज करत आहात. आम्ही काय म्हणतोय, शेतकऱ्यांचे, गरिबांचे, युवकांचे, स्पर्धा परीक्षांचे, बेरोजगारीचे, महिला सुरक्षेचे, आरोग्याचे प्रश्न सोडवा. याबद्दल चर्चा करु. बोलुया. पण त्यांना अहंकार आहे. तहसीलदारला पाठवतात, या शहराच्या भाजप अध्यक्षाला पाठवतात. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद नाही?”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleINDvsSA | पावसाची जोरदार ‘बॅटिंग’; भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द
Next Article Police Bharti 2024 | लातूरचा पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण संसदेत का घुसला? धक्कादायक माहिती समोर..
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.