आज 30 डिसेंबर 2023, पंतप्रधान नरेंद्र मोदी या एकदिवसीय दौऱ्यात 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांचे अयोध्येत शिलान्यास करणार आहेत.
PM Modi : पंतप्रधान अयोध्या विमानतळावर पोहचणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार अयोध्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान अयोध्याला 15,700 कोटी रुपयांच्या योजनांची भेट देणार आहेत. पीएम मोदी सकाळी 10.45 वाजता अयोध्या विमानतळावर पोहचणार आहे.
Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप
अयोध्या, दि. 30 डिसेंबर 2023 | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अयोध्या दौरा होणार आहे. रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टच्या उद्घाटन सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एकदिवसीय दौऱ्यात 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांचे शिलान्यास करणार आहेत.

Table of Contents
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे आयोध्यामध्ये ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आजपासून अयोध्याच्या सर्व रस्ते मोठे वाहनांसाठी तसेच चार चाकावरून प्रवास बंद करण्यात आलेले आहे. आता अयोध्या पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचणार आहे.

या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा वंदे भारत ट्रेन आणि दोन अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. त्यात मुंबई आणि जालना वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील सर्व अपडेट आणि अयोध्येतील प्रत्येक घडामोडींसाठी दिवसभर ब्लॉग फॉलो करा.
