राज्य शासनाचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा’ अभियानाचा द्वितीय पुरस्कार प्राप्त
जामखेड प्रतिनिधी
एच् यु गुगळे HU Gugle पतसंस्थेचे चेअरमन रमेश गुगळे यांनी अभिनंदन पत्रात म्हटले आहे की,आपल्या सारोळा शाळेस नुकताच राज्य शासनाचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे समजले. आपल्या शाळेच्या माध्यमातुन जामखेड तालुका राज्यस्तरावर झळकत असल्याचं पाहून अतिशय अभिमान वाटला तुमचं कौतुक करण्याचं मनात आलं.

सदर पुरस्कारास पात्र होण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत, तुमचे कार्य हे उल्लेखनीय असुन या पुरस्कारासाठी तुमच्यासह सर्व शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तसेच इतर संबंधितांचे मनपूर्वक अभिनंदन. आपल्या देशास उज्ज्वल बनवणे हे या नव्या पिढीच्या हातात आहे व त्यांना उज्ज्वल भविष्य देण्याचे तुमच्या हातात, या चिमुकल्यांचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे पाहून आनंद झाला. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारी चिकाटी, शाळेस स्वच्छ ठेवण्यासाठी लागणारे सातत्य व तुमची शिस्त या गोष्टी तुम्ही कधीच सोडल्या नाहीत त्याचे फळ म्हणजे हा पुरस्कार आहे असे आम्हाला वाटते.
तुमचे हे कार्य अभिनंदनीय असून तुमच्यासोबतच इतर सर्व विद्यार्थी,ग्रामस्थ, व गावच्या सरपंच सौ. रितूताई अजय काशिद या सुद्धा या अभिनंदनास पात्र आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचे अभिनंदन, व भविष्यात असेच कार्य आपल्या हातून घडो याच शुभेच्छा!
या प्रसंगी मी आपणांस हेच सांगू इच्छितो कि एच. यु गुगळे HU Gugle परिवार हा कायमच चांगल्या कामात हातभार लावत आला आहे, तुमच्या या कार्याबद्दल मी हे सांगतो कि भविष्यात आम्ही कायम आपल्या सोबत असु.
