आ. जयंत पाटील, खा. संजय राउत यांची उपस्थिती
महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. नीलेश लंके Nilesh lanke यांच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या शुभारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राउत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अंकुश काकडे हे उपस्थित राहणार आहेत.
हे नक्की वाचा
BJP| भाजप विरोधात शिंदे गटात धुसफूस वाढली; भाजपचा सर्व्हेच्या नावाखाली जागांवर डल्ला?

सोमवारी सकाळी ९ वाजता पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. शुभारंभानंतर मंगळवारपासून पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये ही यात्रा जाणार आहे.
Nilesh lanke यांचा या दिवशी या तालुक्यात जनसंवाद
पाथर्डीनंतर इतर तालुक्यांमध्ये या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ एप्रिल रोजी नगर येथील विशाल गणपती मंदीरात या यात्रेचा समारोप होईल. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे अध्यक्ष आमदार आदीत्य ठाकरे माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी नीलेश लंके यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्रीच संगमनेर येथे काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेउन दिड तास चर्चा केली.
लंके Nilesh lanke यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लंके हे मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील गावागावांतील नागरीकांशी संवाद साधणार आहेत. विविध गावांमधील नागरीकांचे काय प्रश्न, समस्या आहेत. वर्षानुवर्षांपासून प्रलंबित राहिलेले काय प्रश्न आहेत याची माहीती ते संकलीत करणार आहेत. माहीती संकलीत करून ते प्रश्न, समस्या दुर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगतानाच प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले.
Table of Contents
या दिवशी या तालुक्यात जनसंवाद
दि. १ ते ४ पाथर्डी, शेवगाव विधानसभा मतदार संघ, दि. ५ ते ८ पाथर्डी, राहुरी,नगर विधानसभा मतदार संघ, दि.९ ते ११ कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघ, १२ ते १४ श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ, दि. १५ ते १६ नगर शहर विधानसभा मतदार संघ.
