पुणे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:-
स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे गेले तीन महिन्यापासून मुख्य रस्त्याच्या कडेला विनापरवानगी खोदलेली चारी जिवघेणी ठरत आहे दिनांक 05/01/2023 रोजी. बापू सरोदे हे शेतातून चारा घेऊन येत असताना ते समोरून दुसरे वाहन आल्यामुळे व रस्ता अरूंद झालेने घसरूण खोदलेल्या चारीमध्ये मोटर सायकल सह पडले .त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली व ते थोडक्यात बचावले या निष्काळजी ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे ते पुढे म्हणाले की गेले तिन

महिन्यापासून गावात संबधित चारी खोदत असताना मधेच काम बंद करून चारी न बुजवता संबंधित लोंढे ठेकेदार चारी उघडी ठेवून निघून गेलेला आहे त्या मजोर ठेकेदारास संपर्क साधला असता तो फोन उचलत नाही असे ते पुढे म्हणाले .सदरची चारी ही स्वामी चिंचोली गावात जाणार्या .मुख्य .रस्त्यालगत असून .जीव घेणे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही .बांधकाम विभागाचे श्री तुपे सर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मागील आठ दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराला चारी बुजविण्याचे आदेश दिले होते परंतु अद्याप जिवघेणी चारी बुजवण्यात आलेली नाही
संबंधित ठेकेदार लोंढे हा अतिशय आडदांड वृत्तीचा असून तो कोणाचेही ऐकत नाही..आमचे प्रतिनिधी. बबनराव धायतोंडे यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराने फोन उचलला नाही अशा ठेकेदारावर बांधकाम विभाग कोणती कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…
