Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nilesh lanke| खासदार नीलेश लंके यांचे खंदे समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला; उपचारासाठी या ठिकाणी रवाना

Nilesh lanke| खासदार नीलेश लंके यांचे खंदे समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला; उपचारासाठी या ठिकाणी रवाना

mahalokwaniBy mahalokwaniJune 6, 2024Updated:June 6, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

खासदार नीलेश लंके Nilesh lanke आणि सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये पारनेर बसस्थानकावर चांगलीच धुमचक्री झाली. यात लंके यांचे निष्ठावान कार्यकर्ते राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय या धुमचक्रीत ,लंके आणि विखे असे दोन्ही गटातील डझनभर कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पारनेर बसस्थानकावर भर दुपारी ही धुमचक्री झाल्याने पळापळ झाली. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरूवात केली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नीलेश लंके आणि भाजपचे (BJP) सुजय विखे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. यात नीलेश लंके खासदार झाले. लोकसभेसाठी विखे यांनी लंके यांच्या होमग्राऊंडवर बरीच फोडाफोडी केली. लंकेंच्या जवळचे कार्यकर्ते फोडून विखेंनी बरोबर घेतले. माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी यात विखेंची साथ केली. विजय औटी यांच्याबरोबर असलेले त्यांचे कार्यकर्ते लंके यांच्या विजयानंतर काहीसे तणावातच आहे. मात्र लंके यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यातूनच ही पारनेरमधील बसस्थानकावर विखे आणि लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धमुचक्री झाली.

राहुल झावरे आणि विजय औटी हे आपआपल्या कार्यकर्त्यांबरोबर समोरसमोर येऊन ही धुमचक्री झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात गाड्यांचे फोडाफोडी झाली. दोन्ही गट भिडल्याने कोण, कोणाला मारत होत हेच कळत नव्हते. यात नीलेश लंके यांचा पीए राहुल झावरे गंभीर जखमी झाले. हा राडा एवढा वाढला की, बसस्थानकावर पळापळी झाली. त्यामुळे काही क्षणात बसस्थानक परिसरातील व्यवसायिकांनी दुकाने बंद करून घेतली.

राहुल झावरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय डझनभर कार्यकर्ते या धुमचक्रीत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पारनेर पोलिसांना या धुमचक्रीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पारनेर बसस्थानकासह काही संवेदनशील भागात पारनेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच पारनेर पोलिसांनी या धुमचक्रीत सहभागी असलेल्याची नावे काढली असून, त्यानुसार धरपकड सुरू केली आहे. या धुमचक्रीवरून पारनेरमध्ये विखे आणि लंके यांच्यातील राजकीय संघर्ष वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पुढील उपचारााठी राहुल झावरे यांना अहमदनगर येथील सुरभी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleManoj Jarange | मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; दिला हा इशारा..
Next Article जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियोजन केले पाहिजे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.