नगर-मधील आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये लुटलेले राहिलेले साहित्य परत मिळावे, पोलिसांनी बरेच साहित्य परत मिळवून दिले परंतु अजूनही बरेच साहित्य मिळाले नाही ते लवकरात लवकर मिळावे अशी विनंती डॉ अनिल आठरे यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे
घटनेचे माहिती अशी कि गणेश फसले,घंट्या उर्फ गणेश घोरपडे व त्याच्या साथीदारांनी आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला.
त्या सर्वानी हॉस्पिटलमधील आय.सी.यु.ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली केली व सर्व साहित्य ३ ट्रक मध्ये बरोबर घेऊन गेले यामधील २ ट्रक मधील सामान मिळाले परंतु तिसरा ट्रक पोलिसांना सापडला नाही त्यामधील हे साहित्य आहे
डॉ आठरे म्हणाले ३५ पैकी १० आरोपी ना पोलिसांनी अटक केली आहे राहिलेल्या आरोपीना पण पोलीस अटक करतील पण हा प्रकार म्हणजे एक प्रकारे ताबेमारी होय, पोलिसांनी हॉस्पिटलला २४ तास संरक्षण दिले आहे. त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतो परंतु असा प्रकार नगरला योग्य नाही याबाबत लोकप्रतिनिधी व पुढारी यांनी याबाबत विचार करून अशा घटना कोणाच्याही बाबतीत घडू नये हे पाहावे
सध्या हॉस्पिटलचे नूतनीकरण चालू असून जी मशिनरी अजून सापडली नाही ती ताब्यात मिळाल्याशिवाय आम्ही हॉस्पिटल सुरु करू शकणार नाही तरी पोलिसांनी ती त्वरित मिळवून द्यावी अशी विनंती आम्ही त्यांना करतो असेही ते म्हणाले
