Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खा. लंके यांच्या आंदोलनात भ्रष्ट पोलिसांच्या तक्रारींचा पाऊस !

खा. लंके यांच्या आंदोलनात भ्रष्ट पोलिसांच्या तक्रारींचा पाऊस !

mahalokwaniBy mahalokwaniJuly 22, 2024Updated:July 22, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खा. नीलेश लंके यांचे उपोषण सुरू

नगर : प्रतिनिधी

नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खा. नीलेश लंके यांनी सोमवारपासून पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सुरू केलेल्या उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांडून पोलिसांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा अक्षरशः धो धो पाऊस पडला. दरम्यान, दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंंद झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका खा. लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.


तक्रारदारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर माध्यमांशी बोलताना खा. लंके म्हणाले, आमच्याकडे आज लेखी स्वरूपात मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. नगर जिल्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत. हप्तेखोरी चालू आहे. गुटख्याच्या गाडया सर्रास सोडल्या जातात. अनेक ट्रकचालकांना लुटले जाते. श्रीगोंदे तालुक्यात भोसले नामक पोलीस अधिकाऱ्याने मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन गायीचा गोठा बंद करून त्यांची उपजिविका बंद केली. पोलीसांची धटींगशाही सुरू आहे. तक्रारी घेतल्या जात नाही. पोलीस अधिकारी, कर्मचारी पैसे गोळा करण्यात मश्गुल आहेत. मी ज्यावेळी लोकसभेची उमेदवारी केली त्यावेळी माझ्या फोन नंबरचे कॉल रेकॉर्डींग काढले. ही धक्कादायक माहीती उजेडात आली त्यावेळी पोलीस अधिक्षक तसेच गुन्हे शाखेची चलाखी उजेडात आली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची तात्काळ बदली करावी त्यांच्याकडील अतिरिक्त कराभार काढून घेण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा खा. लंके यांनी यावेळी दिला.


यावेळी अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, किरण काळे, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, प्रकाश पोटे, बाबाजी तरटे, सुदाम पवार, सुवर्णा धाडगे, अ‍ॅड. राहुल झावरे, बाळासाहेब खिलारी, अभयसिंह नांगरे, चंद्रभान ठुबे, प्रा. संजय लाकूडझोडे, ज्ञानदेव लंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते, तक्रारदार यावेळी उपस्थित होते.

आंदोनल दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो

हे आंदोलन दडपण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी आंदोलनात सहभागी होऊन वाईट कृत्य केले जाउ शकते. पोलीस बळाचा वापर करू शकतात. त्यातून खोटे गुन्हे दाखल करण्याचाही प्रयत्न होईल त्यामुळे संपूर्ण आंदोलनादरम्यान माध्यम प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी व्हिडीओ रेकॉडींग करण्याचे आवाहन खा. नीलेश लंके यांनी यावेळी केला.

सुवर्णकारांना जाच

एका गुन्हयातील मुद्देमाल दहावेळा वसुल केला जातो. सुवर्णकारांना अनधिकृत लॉक अप मध्ये बसवून दहशत निर्माण केली जाते. पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचेही कॉल ट्रॅकिंग करतात. त्यामुळे या विभागाकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली पाहिजे. अनिल राठोड यांच्यानंतर खा. नीलेश लंके यांनी सुवर्णकार बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे.

श्री लाळगे, अध्यक्ष सुवर्णकार संघटना

मंगळवारी पोलीस ठाण्यांसमोर उपोषण

खा. लंके यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी मंगळवारी नगर लोकसभा मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यांसमोर उपोषण करण्याचा इशारा महाविकास आघाडी तसेच नीलेश लंके प्रतिष्ठाणचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNilesh Lanke। खासदार लंकेंनी पालकमंत्री विखेंचा शब्द पाळला; अखेर जनआक्रोश आंदोलन स्थगित
Next Article ताराबाईने अंगावरची साडी दोर म्हणून फेकली अन्; वाचला तीन भावांचा जीव धक्कादायक घटना
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.