Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » चला जामखेड वाचवूया प्रारूप विकास आराखडा रद्द करा; उद्या जामखेड बंद- प्रा.मधुकर राळेभात

चला जामखेड वाचवूया प्रारूप विकास आराखडा रद्द करा; उद्या जामखेड बंद- प्रा.मधुकर राळेभात

mahalokwaniBy mahalokwaniAugust 26, 2024Updated:August 26, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रारुप विकास आराखडा कृती समितीच्या वतीने आज रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ‘चला जामखेड वाचवू “या धोरणामुळे प्रारूप विकास आराखडा अन्यायकारक आहे.असे मत प्रा.मधुकर राळेभात म्हणाले .


उद्या जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी प्रा. मधुकर राळेभात,अमित चिंतामणी,अॅड. शमा हाजी काझी,विनायक राऊत,आकाश बाफना,राहुल उगले, अविनाश साळुंके ,अमोल गिरमे ,अशोक जावळे, डॉ. संजय राऊत, राजेंद्र देशपांडे ,सय्यद जावेद , विजय गव्हाणे, गौतम बाफना आदी जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे सदस्य , ग्रामस्थ उपस्थित होते.


जामखेड शहराचा विकास झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून प्रारूप विकास आराखडा होणे अपेक्षित होते.पंरतु जामखेड नगरपरिषद प्रशासनाने व नगर रचना विभागाने सध्या तयार केलेला आराखडा हा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने नसून जामखेड शहर भकास करण्याचा हा आराखडा आहे. जामखेड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी, पदवीधर सर्व क्षेत्रातील बहुसंख्य शहरवासीयांच्या विरोध असून या आराखड्या विरोधात जामखेडकर जन आंदोलन उभे करत आहेत, जामखेड शहरातील किमान १५००० लोक बाधित होत आहेत त्यांना अंधारात ठेवून नगर परिषद हा आराखडा लोकांवर लादत आहे आणि यासाठी समस्त जामखेडकर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी व हा अन्यायकारक आराखडा रद्द करुन जामखेडकरांना विश्वासात घेऊन नवनियुक्त नगरपरिषद पदाधिकारी यांची निवड झाल्यावर नव्याने आराखडा बनवावा ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आज सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालय समोर येथे सुरू करण्यात आले. तसेच उद्या मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी जामखेड बंद चे आवाहन करण्यात आले आहे. जामखेड कृती समितीने म्हटले आहे की, नगर परिषदेचा प्रारूप विकास आराखडा बेकायदेशीररित्या पार झाला व तो करताना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेने केला व अद्याप करीत असल्याने सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी उपोषण व धरणे आंदोलन तर मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी जामखेड बंदचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रारूप विकास आराखडा दुरुस्त करण्यासाठी जामखेड कृती समिती स्थापन करण्यात येऊन तिच्या तर्फे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

जामखेड नगरपरिषदेने प्रशासकांनी फक्त कलमं पुढे केली व त्यातील मुदती वाढवून लावल्यामुळे कृती समितीच्या वतीने उद्या जामखेड बंद चे सदरचा आराखडा हा सदोष व बेकायदेशीर झाला असून तो बळजबरीने लागू करू पाहत आहे त्यासाठी जामखेड वासियांना आंदोलन करण्याची वेळ आली असल्याने सदर प्रारूप नगर रचना आराखडा सुधारित करावा अथवा रद्द करावा.उद्या मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी जामखंड बंदची हाक देण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar| रोहित पवारांवर पदाधिकारी नाराज; प्रा.मधुकर राळेभात यांनी केले गंभीर आरोप
Next Article Jamkhed| जामखेडच्या राजकरणात सर्वात मोठा बदल; दोन प्राध्यापक एकत्र येणार..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.