पारनेर : प्रतिनिधी
कान्हूरपठार ग्रामपंचायतमधील आझाद ठुबे गटाच्या सात सदस्यांनी मंगळवारी रात्री सुपे येथे खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात विनाअट प्रवेश केला. यापुढील काळात खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करून सर्व निवडणूका एकदिलाने लढविण्याचा शब्द या सदस्यांनी खा. लंके यांना दिला. लंके यांनी पक्षाचा पंचा गळयात घालू सर्वांचे स्वागत केले.
Pratap Dhakne | उमेदवारी फिक्स; मविआचा शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाचा चेहरा प्रताप काका ढाकणे !

Ranitai Lanke | राणीताई लंके यांच्या विजयासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य एकवटले
सन २०२३ मध्ये कान्हूरपठार ग्रामपंचायतीची सार्वत्रीक निवडणूक होऊन नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पंचरत्न जय जवान जय किसान पॅनलने सरपंच पदासह सहा जागा जिंकत ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली. या पॅनलच्या विजयाने आझाद ठुबे गटाची वर्षानुवर्षांची सत्ता संपुष्टात येउन गावात सत्तांतर झाले होते. लोकनियुक्त सरपंच म्हणून संध्या किरण ठुबे या विजयी झाल्यानंतर उपसरपंचपदावर नीलेश लंके यांचे खंदे समर्थक प्रसाद अशोक नवले यांची वर्णी लावण्यात आली. ग्रामपंचयतीची सत्ता आल्यानंतर खा. लंके यांनी पदाधिकाऱ्यांना बळ देत कोटयावधी रूपयांची कामे दिली. सत्ताधारी पदाधिकारी सक्षमपणे काम करत असल्याने लोकसभा निवडणूकीत कान्हूरपठार गावामध्ये खा. लंके यांना ५५१ मतांची आघाडी मिळाली होती.

Table of Contents
खा. लंके यांच्या पाठीशी जनमताचा कौल असल्याने विरोधात असलेल्या आझाद ठुबे समर्थक सहा सदस्यांनीही खा. लंके यांना समर्थन देण्याचा निर्णय घेत पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई नीलेश लंके Ranitai Lanke यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. यापुढील काळात खा. लंके यांच्यासोबत काम करण्याचा तसेच सर्व निवडणूका एकदिलाने लढविण्याची ग्वाही यावेळी या सदस्यांनी दिली.
सर्व सदस्यांना न्याय देणार खा. नीलेश लंके लोकसभा सदस्य
राजकारण हे निवडणूकीपुरतेच असते. निवडणूकीनंतर गावाचा विकास हेच ध्येय असते. त्यामुळे आपण विकास निधी देताना कधीही भेदभाव केला नाही. आता विरोधी गटाचे सहा सदस्य आमच्यासोबत आले असून त्यांना योग्य सन्मान देत न्याय देण्यात येईल.

यावेळी मा. उपसरपंच सागर व्यवहारे, सचिन ठुबे, किशोर ठुबे, कैलास ठुबे, अमोल ठुबे, राजेंद्र भांबे, किरण शंकर ठुबे, अशोक ठुबे, युवराज ठुबे, प्रविण ठुबे, अंबादास ठुबे, अक्षय ठुबे हे उपस्थित होते.
