नगर – प्रत्येक कॉलनीत, सोसायटीत आता अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार वाढत आहे. विविध देव-देवतांची मंदिरे, अखंड हरिनाम सप्ताह, नित्यनियमाने होणारे धार्मिक कार्यक्रमांमुळे नागरिक एकत्र येतात. यामुळे सामाजिक एकता, प्रेम टिकते अशा अध्यात्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास होणे अपेक्षित आहे. सावेडी उपनगरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्यावतीने मनपा सभागृह नेतेपदी विनित पाउलबुधे यांची तर स्थायी समिती समिती सदस्यपदी निवड झालेले सुनिल त्र्यंबके यांचा तसेच वेळोवेळी मंदिर उभारणीसाठी, प्रवेशद्वाराकरीता सहकार्य करणारे माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांचा व माजी जि.प.सदस्य बाळासाहेब सोनवणे यांची जिल्हा फेडरेशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुनिल मानकर, जितेंद्र चत्तर, बाबासाहेब मरकड, गिरिश धर्माधिकारी, संतोष उपाध्ये,…
Author: mahalokwani
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी : – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. आज सकाळी ठीक १२:०० वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका गडावरून उद्योजक राजेंद्र विष्णू खाडे, पोपट हरी बडे,सचिन नामदेव बडे यांचे वतीने हेलिकॉफ्टर ने आणल्या जाणार आहेत. गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर हेलिकॉपटर ने मंडपावर पुस्पवृष्टी करण्यात येईल व त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे. आठ दिवस काकडा,रामकथा,हरिपाठ प्रवचन,कीर्तन,जागर,आदी कर्यक्रम होणार आहेत. चिंचपूर पांगुळ-माणेवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराजांच्या अखंड…
जगातली अनेक ठिकाणं वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणं समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखली जातात, काही ऐतिहासिक महत्त्वामुळे ओळखली जातात, तर काही ठिकाणी स्वच्छता आणि सुंदरता इतकी असते की आपली नजर तिथून हटत नाही. नेदरलँड्समध्ये असं एक गाव आहे, जिथे रस्तेच नाहीत. होय. तुम्ही बरोबर वाचत आहात, तिथे रस्ते नसलेलं गाव आहे आणि ते गाव खूपच सुंदर आहे. या गावात कार, बाइक यासारखी वाहनंही नाहीत. या गावात राहणारे लोक त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी बोटीचा वापर करतात. नदीकाठी असलेलं हे गाव सर्वात लहान गाव आहे. इथलं प्रदूषणमुक्त नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दूरवरून लोक भेटी देतात. या गावातली टुमदार घरं आणि नदीतलं स्वच्छ पाणी पाहून मन प्रसन्न…
मुंबई : गेल्या काही दिवासांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने सुटकेचा श्वास सोडणाऱ्या राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात शनिवारी 437 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर आज राज्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ✦ सक्रिय रुग्णसंख्या वाढली राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 1956 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,71,795 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. ✦ पुणेकरांची चिंता वाढलीशनिवारी राज्यात 437 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 242 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.…
आमदार रोहित पवार यांची शालेय विद्यार्थ्यांना अनोखी भेट; मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुखकर जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार कर्जत / जामखेड | आमदार झाल्यापासून मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मतदारसंघातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये या बाबीकडे विशेष लक्ष घातले. नुकताच मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी अभिनव उपक्रम राबवला आहे. त्यानुसार मतदारसंघातील तब्बल १० हजार ५ वी ते १० वीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती ऍग्रो व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या सहकार्याने मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ ता.पाथर्डी येथील ग्रामदैवत मलिक (मलकेश्वर) महाराजांच्या तसेच सालशीदबाबा यात्रोत्सवाची सांगता आज (दि.२५) रोजी कुस्त्याचा हंगामाच्या कार्यक्रमाने झाली.यात्रा महोत्सवासाठी भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. श्रीक्षेत्र पैठण व नागतळा येथून पायी कावडधाऱ्यांनी आणलेल्या पाण्याने गुरुवारी सायंकाळी मलिक देवास जलाभिषेक घालण्यात आला.तरुणांनी यावर्षी येथे प्रथमच तमाशा,ऑर्केस्ट्रा,कार्यक्रमास फाटा देऊन हरीकीर्तन ठेवले होते. शुक्रवारी रात्री राष्ट्रीय किर्तनकार हभप. सुनिताताई अभिमंन्यू आंधळे महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. आज सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम झाला . दुपारी कुस्त्यांचा जगीं हगामा भरवण्यात आला होता. या कुस्त्यासाठी नामवंत मल्लानी हजेरी लावली होती.यावर्षी प्रथमच भव्य दिव्य असे कुस्त्यांचे सामने खेळवले गेले. रात्री उशिरापर्यंत…
पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे. दिनांक .25/03/2023 रोजी खानवटे तालुका दौंड .भिगवन राशिन रोड .वरती असणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग उड्डाण फुलाशेजारी खानवटे गावच्या बाजूस आंदाजे 700 फुट .अंतरावर एका अनोळखी तरुणाचा रेल्वे ट्रॅक शेजारी मृतदेह सापडला आहे, त्याच्या अंगावर निळसर रंगाचा चौखडा शर्ट.राखाड्या रंगाची पॅन्ट तांबड्या कलरचा कंबरेचा बेल्ट तसेच त्याच्या खिशामध्ये मुस्लिम समाज वापरत असलेली गोल टोपी सापडली आहे ..त्यामुळे हा तरुण मुस्लिम समाजाचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या तरुणाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. या अनोळखी तरूणा बाबत काही माहिती अगर कोणी ओळखत असल्यास दौंड पोलीस स्टेशन येथे फोन नंबर ..02117262333 या नंबर…
या अनोख्या सोहळ्यास विरोधी पक्षनेते अजितदादा पवार राहणार उपस्थित जामखेड प्रतिनिधी धनराज पवार कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवून आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व बारामती ऍग्रो लिमिटेड आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या सहकार्याने तब्बल १० हजार गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवारही उपस्थित असणार आहेत. कर्जत शहरातील फाळके पेट्रोल पंपा शेजारील मैदानावर हा सोहळा 26 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आलेला…
महालोकवाणी न्यूज प्रतिनिधी: धनराज पवार पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबदल विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी सन्मानीत केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉ. शेखर पाटील यांनी सन्मानीत केले. निरिक्षक गायकवाड यांनी सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन केली.त्यांच्या कार्याबदल सन्मानीत करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक ज्योती भोर, पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, नगर स्थानिक गुन्हे शाखेचे…
मागील संपूर्ण आठवडा विविध माध्यमातून महिलांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करीत काल ८ मार्च रोजी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी “जागतिक महिला दिन ” (World women’s day) म्हणून साजरा केला गेला. ‘जागतिक महिला दिना World women’s day) ‘च्या निमित्ताने वर्तमानपत्र, सोशल मिडियांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरलेले होते. देशभरात त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्यात महिलांना शुभेच्छा देत अनेक पुरस्कार दिले व घेतले गेले. यासर्व पुरस्कार समारोहात वेगळा आणि त्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी घ्यावी असा समारोह म्हणजे बेंगळुरू येथे संपन्न झालेला ‘वेमपावर’. या समारोहात “बेस्ट माॅम आॅफ द वर्ल्ड ” हा खिताब जाहीर करण्यात आला…