महालोकवाणी न्यूज: राज्यात अवकाळी पावसाचा कहर कालपासून सुरु झालाय. हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला धास हिरावून घेणारा असाच आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस कधी जाणार? असा प्रश्न अनेकांना सतावतोय. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढचे तीन दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. एक द्रोणीय स्थिती द. कोकण ते मध्य छत्तीसगड पर्यंत आहे. त्या प्रभावाखाली 6-9 मार्च काळात महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. 6-7 मार्चला गुजरात व मध्य महाराष्ट्रात, तर 7 मार्चला मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा…
Author: mahalokwani
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी कांदा , कापूस , वीज तोडणे , सिलेंडर दरवाढ आदी विरोधात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी (pathrdi) येथील प्रांताधिकारी कार्यालयाला कापसाचे व कांद्याचे तोरण बांधून कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर सरकार विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी गळ्यात कांदा व कापसाच्या माळा घातल्या होत्या.यामुळे सुमारे एक ते दीड तास दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती . यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आक्रोश केला. अतिवृष्टीचे मागील वर्षी चे राहिलेले गावातील तसेच यावर्षीचे थकीत अनुदान त्याचप्रमाणे कांदा,ऊस,तूर,कापूस,सह विविध पिकांना हमीभाव द्यावा , शेतकऱ्यांचे शेती पपंचे वीज कनेक्शन कट…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी हिंदू समाजावर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ वनगर शहरातील बजरंग दलाचे शहर संयोजक कुणालजी भंडारी व रामवाडी येथील अशोक लोंढे शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने या गावातील अमोल जरे या हिंदू तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अखंड हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद,बजरंग दल पाथर्डी प्रखंडच्या वतीने मा.पोलीस निरीक्षक पाथर्डी (pathrdi) यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तात्काळ अटक करावी व कठोर शासन करावे. अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.दिवसेंदिवस हिंदू धर्माचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जाणूनबुजून हल्ले केले जात आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी कार्येकर्त्याकडून व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री देवा पवार, प्रमोद राऊत,…
साईबाबांचे आशिर्वाद व नागरिकांचे सहकार्याने प्रभाग आदर्श करणार – नगरसेवक सुनिल त्र्यंबके विजय मते: नगर – आपले काम करतांना ते निष्ठेने व श्रद्धेने केले तर त्यास यश मिळते. कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ कार्यकर्ता म्हणून मी आध्यात्मिक क्षेत्रात काम केले ते करतांना समाज कार्याची आवड म्हणून लोकांसाठी कार्यरत राहिलो. साईबाबांचे आशिर्वाद व नागरिकांचे सहकार्याने नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीनंतर स्थायी समिती सदस्य म्हणून आता माझी निवड झाली तसेच माझे सहकारी नगरसेवक विनित पाउलबुधे यांची सभागृह नेतापदी निवड झाली. ही बाब प्रभागाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. आम्ही चारही नगरसेवक प्रभाग आदर्श केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारस्पर्धा परीक्षा करत असताना आपण नियमित व सखोल वाचन केले पाहिजे. त्याच बरोबर सतत शिक्षण घेवून उच्च विद्या विभूषित झाले पाहिजे .स्पर्धा परीक्षा करत असताना संयम महत्त्वाचा असून योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षेत अपयश आले तर दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले जामखेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे शांत व प्रसन्न ,वातावरण, विविध प्रकारची पुस्तके, वर्तमानपत्रे मासिके व इतर सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले.स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या दरमहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘अधिकारी आपल्या भेटीला, या उपक्रमाचे कौतुक केले.जामखेड नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून हजर झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये…
महालोकवाणी न्यूज: धनराज पवार: कर्जत / जामखेड | महा आवास योजनेअंतर्गत राज्यभरात २० नोव्हेंबर-२०२२ पासून घरकुलाचे सर्वाधिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत टप्पे ठरवून त्या टप्प्यांवर घरकुलाचे कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले. राज्यभरातील घरकुलांच्या कामांना गती देण्याचा याद्वारे सरकारचा प्रयत्न होता. अखेर या अभियानाची नुकतीच आकडेवारी जाहीर झाली असून अहमदनगर जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांना धोबीपछाड देत १० हजार १९९ घरकुल पूर्ण करून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तालुक्यात १३२६ घरकुल पूर्ण करून जामखेड तालुका प्रथम क्रमांकावर तर १२८२ घरकुल पूर्ण करून कर्जत तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा पद्धतीने…
महालोकवाणी न्यूज: सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील पूर्वेेकडील शेवटचे टोक असलेल्या चिंचपुर पांगुळ मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीपासुन पहिल्यांदाच बाल आनंद बाजार भरला असून मुलांना शालेय ज्ञानाबरोबर व्यवहारज्ञान समजावे,त्याचे प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(१ली ते ४थी) चिंचपूर पांगुळ येथे आज (ता.४)शनिवार रोजी बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. अहंमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच या परिसरात बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता. बाल आनंद बाजाराच्या माध्यमातून मुलांमध्ये शालेय ज्ञानासोबत व्यवहार ज्ञानाचे आकलन व्हावे,नफ-तोटा समजावा हा यामागचा उद्देश असल्याचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. या बाजारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, चहा,नास्ता तसेच सर्वप्रकारचा सेंद्रिय भाजीपाला…
महालोकवाणी न्यूज जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची पारनेर येथे नुकतीच बदली झाल्याने आज रोजी जामखेड पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सत्कार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासमोर जामखेड मधील वाढते गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत , संभाजी गायकवाड साहेबांनी जामखेडची कायदा व सुव्यवस्था अतिशय छान पद्धतीने हाताळली आहे . सर्व समाज घटकांना समान न्याय दिला आहे त्यामुळेच गायकवाड साहेबांना जामखेडकरांनी खूप सन्मान दिला होता जामखेड कर्जत या मतदारसंघात दोन आमदार आहेत दोन्ही आमदार वेगवेगळ्या पक्षाचे आहेत त्याच्यामुळे या…
महालोकवाणी न्यूज:- सोलापूर, 4 मार्च : सध्या कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांच्या आक्रोशाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सामोरे जावे लागले. सोलापुरात नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. भैया देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीवर कांद्याने आंघोळ घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ते निवदेन देण्यासाठी आले असता पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सोलापुरात नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत गोंधळ निर्माण झाला.…
महालोकवाणी न्यूज: जामखेड | प्रतिनिधी — धनराज पवार जगा आणि जगु द्या. हे जैन धर्माचे मुळ तत्व ख-या अर्थाने आचरणात आणत सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य वाखणण्याजोगे असल्याचे बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन काॅन्फरन्स ,पुणे येथील संचेती हाॅस्पीटल आणि जामखेड येथील समर्थ हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महावीर भवन मध्ये मोफत अस्थीविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मोफत अस्थिविकार शिबीरात तब्बल २७० रूग्णांची तपासणी करून, या रूग्णांना मोफत औषधे देण्यात आली. तर अनेक रूग्णांची अत्याधूनिक मशीनव्दारे मोफत बी एम डी (हाडांंची…