Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नूतन सभागृहनेते विनित पाउलबुधे व स्थायी सदस्य सुनिल त्र्यंबके यांचा सत्कार

नूतन सभागृहनेते विनित पाउलबुधे व स्थायी सदस्य सुनिल त्र्यंबके यांचा सत्कार

mahalokwaniBy mahalokwaniMarch 6, 2023Updated:March 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

साईबाबांचे आशिर्वाद व नागरिकांचे सहकार्याने प्रभाग आदर्श करणार – नगरसेवक सुनिल त्र्यंबके

विजय मते: नगर –

आपले काम करतांना ते निष्ठेने व श्रद्धेने केले तर त्यास यश मिळते. कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ कार्यकर्ता म्हणून मी आध्यात्मिक क्षेत्रात काम केले ते करतांना समाज कार्याची आवड म्हणून लोकांसाठी कार्यरत राहिलो. साईबाबांचे आशिर्वाद व नागरिकांचे सहकार्याने नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीनंतर स्थायी समिती सदस्य म्हणून आता माझी निवड झाली तसेच माझे सहकारी नगरसेवक विनित पाउलबुधे यांची सभागृह नेतापदी निवड झाली. ही बाब प्रभागाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. आम्ही चारही नगरसेवक प्रभाग आदर्श केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

निर्मलनगर येथील शिवनगरमधील नागरिकांच्यावतीने मनपाचे नूतन सभागृहनेते विनित पाउलबुधे व स्थायी समिती सदस्य सुनिल त्र्यंबके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बबनराव नागरे, अनिल काळे, बाळासाहेब आंधळे, महेंद्र पांडे, विश्वनाथ कुताळ, भरत पोळ, किशोर कानडे, नवनाथ वांढेकर, प्रशांत पालवे, विठ्ठल आंधळे आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवनगर नागरिकांनी दाखविलेले प्रेम, विश्वास आम्ही कधी विसरणार नाही. या कॉलनीमध्ये नागरिकांच्या मागणीप्रमाणे रस्ते, पाणी, वीज कचरा समस्या आम्ही चारही नगरसेवकांनी सोडविल्या; चांगली कामे या भागात झाली. त्यामुळे मनपाच्या महापौर, उपमहापौर, पदाधिकारी आदिंनी सभागृह नेतापदी नियुक्ती करुन जी जबाबदारी माझ्यावर सोपावली ती यशस्वीपणे पार पाडू, असे नगरसेवक व मनपाचे नूतन सभागृह नेते विनित पाउलबुधे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.
प्रास्तविकात अनिल काळे म्हणाले, शिवनगरच्या विकासासाठी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांच्यासह आ.संग्राम जगताप यांनी देखील या भागात मोठ्या प्रमाणात निधी दिला. या सर्वांचे आम्ही आभार मानतो.
शेवटी श्री.शिवसाठ, श्री.धामणे, श्री.बगाडे, श्री.कार्ले, आठरे सर, पांडे सर, श्री.राशीनकर, श्री.उल्हारे, श्री.सूर्यपुजारी आदिंनी मनोगते व्यक्त केले. जाधव सरांनी आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleस्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करा :- मुख्याधिकारी अजय साळवे
Next Article अखंड हिंदू समाज,विश्व -हिंदू परिषद, आणि बजरंग दलाच्या वतीने पाथर्डी पोलीस निरीक्षकांना निवेदन..!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.