जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारस्पर्धा परीक्षा करत असताना आपण नियमित व सखोल वाचन केले पाहिजे. त्याच बरोबर सतत शिक्षण घेवून उच्च विद्या विभूषित झाले पाहिजे .स्पर्धा परीक्षा करत असताना संयम महत्त्वाचा असून योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षेत अपयश आले तर दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले जामखेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे शांत व प्रसन्न ,वातावरण, विविध प्रकारची पुस्तके, वर्तमानपत्रे मासिके व इतर सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले.स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या दरमहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘अधिकारी आपल्या भेटीला, या उपक्रमाचे कौतुक केले.जामखेड नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून हजर झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज: धनराज पवार: कर्जत / जामखेड | महा आवास योजनेअंतर्गत राज्यभरात २० नोव्हेंबर-२०२२ पासून घरकुलाचे सर्वाधिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत टप्पे ठरवून त्या टप्प्यांवर घरकुलाचे कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले. राज्यभरातील घरकुलांच्या कामांना गती देण्याचा याद्वारे सरकारचा प्रयत्न होता. अखेर या अभियानाची नुकतीच आकडेवारी जाहीर झाली असून अहमदनगर जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांना धोबीपछाड देत १० हजार १९९ घरकुल पूर्ण करून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तालुक्यात १३२६ घरकुल पूर्ण करून जामखेड तालुका प्रथम क्रमांकावर तर १२८२ घरकुल पूर्ण करून कर्जत तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा पद्धतीने…
महालोकवाणी न्यूज: सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील पूर्वेेकडील शेवटचे टोक असलेल्या चिंचपुर पांगुळ मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीपासुन पहिल्यांदाच बाल आनंद बाजार भरला असून मुलांना शालेय ज्ञानाबरोबर व्यवहारज्ञान समजावे,त्याचे प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(१ली ते ४थी) चिंचपूर पांगुळ येथे आज (ता.४)शनिवार रोजी बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. अहंमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच या परिसरात बाल आनंद बाजार भरवण्यात आला होता. बाल आनंद बाजाराच्या माध्यमातून मुलांमध्ये शालेय ज्ञानासोबत व्यवहार ज्ञानाचे आकलन व्हावे,नफ-तोटा समजावा हा यामागचा उद्देश असल्याचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. या बाजारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, चहा,नास्ता तसेच सर्वप्रकारचा सेंद्रिय भाजीपाला…
महालोकवाणी न्यूज जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची पारनेर येथे नुकतीच बदली झाल्याने आज रोजी जामखेड पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा सत्कार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासमोर जामखेड मधील वाढते गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत , संभाजी गायकवाड साहेबांनी जामखेडची कायदा व सुव्यवस्था अतिशय छान पद्धतीने हाताळली आहे . सर्व समाज घटकांना समान न्याय दिला आहे त्यामुळेच गायकवाड साहेबांना जामखेडकरांनी खूप सन्मान दिला होता जामखेड कर्जत या मतदारसंघात दोन आमदार आहेत दोन्ही आमदार वेगवेगळ्या पक्षाचे आहेत त्याच्यामुळे या…
महालोकवाणी न्यूज:- सोलापूर, 4 मार्च : सध्या कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांच्या आक्रोशाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सामोरे जावे लागले. सोलापुरात नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. भैया देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीवर कांद्याने आंघोळ घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ते निवदेन देण्यासाठी आले असता पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सोलापुरात नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत गोंधळ निर्माण झाला.…
महालोकवाणी न्यूज: जामखेड | प्रतिनिधी — धनराज पवार जगा आणि जगु द्या. हे जैन धर्माचे मुळ तत्व ख-या अर्थाने आचरणात आणत सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य वाखणण्याजोगे असल्याचे बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन काॅन्फरन्स ,पुणे येथील संचेती हाॅस्पीटल आणि जामखेड येथील समर्थ हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महावीर भवन मध्ये मोफत अस्थीविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मोफत अस्थिविकार शिबीरात तब्बल २७० रूग्णांची तपासणी करून, या रूग्णांना मोफत औषधे देण्यात आली. तर अनेक रूग्णांची अत्याधूनिक मशीनव्दारे मोफत बी एम डी (हाडांंची…
बीड : बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिर इथं कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘परिवार एकाठिकाणी असणे हे खूप मोठं भाग्य असतं आणि त्यांना एकवटून ठेवण्याचे भाग्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. आम्हाला कोणी मोठा भाऊ आहे का? आम्ही तिघी बहिणीच आहोत, असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत भावुक झाल्या. ‘आज मला बाबांचा चेहरा आपल्यात दिसला. बाबा म्हणायचे की, बेटा तुझ्या कार्यकर्त्यांना आतापासूनच टक्कल पडत आहे. मात्र माझ्या कार्यकर्त्यांना भरपूर केस आहेत. आज जर ते असते तर ते म्हणाले असते की, आपलं वय जगाला कळेल असत…
जामखेड पहिल्या तर कर्जत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार कर्जत / जामखेड | कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके पूर्वी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जायचे. परंतु आता ही ओळख पुसली जाऊन या ना त्या कारणाने कर्जत-जामखेड तालुके राज्यस्तरावर आपले नावलौकिक मिळवत आहेतच. शिवाय नुकतेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये जामखेड व कर्जत जिल्हा स्तरावर अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर आले आहे. रोजगार हमी योजना राबवण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटविकास अधिकारी यांचा गुणगौरव समारंभ यशवंतराव चव्हाण केंद्र नरिमन पॉईंट येथे राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व कर्जत येथील गटविकास अधिकारी श्री.…
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या निवडीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश आहे. निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणुक आयुक्तांच्या निवडीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आयुक्तांच्या निवडीसाठी समिती नेमणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्टाने दिली आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि CJI यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आता निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते सरन्यायाधीश यांची समिती राष्ट्रपतींकडे शिफारस करणार आहे. सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करत होते. न्यायमूर्ती केएम जोसेफ…
जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार नटून-थटुन जमले सारे,गाणे वाजते,बक्षीस मिळतेस्पर्धांचा या डौलच न्यारा,शिक्षक सारे प्रसन्न हसतीम्हणुनी शाळा नंदनवन भासते ! या उक्तीप्रमाणे प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणदर्शनाने, जामखेड शहरातील बिड रोड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन आदित्य गार्डन च्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे व सौरभ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. या वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांच्या मनात दडलेल्या सुप्त प्रतिभेला नवे वळण देऊन काहीतरी नावीन्यपूर्ण घडविण्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न करावा असे मत गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी व्यक्त केले.…