Author: mahalokwani

बीड : बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिर इथं कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘परिवार एकाठिकाणी असणे हे खूप मोठं भाग्य असतं आणि त्यांना एकवटून ठेवण्याचे भाग्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. आम्हाला कोणी मोठा भाऊ आहे का? आम्ही तिघी बहिणीच आहोत, असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत भावुक झाल्या. ‘आज मला बाबांचा चेहरा आपल्यात दिसला. बाबा म्हणायचे की, बेटा तुझ्या कार्यकर्त्यांना आतापासूनच टक्कल पडत आहे. मात्र माझ्या कार्यकर्त्यांना भरपूर केस आहेत. आज जर ते असते तर ते म्हणाले असते की, आपलं वय जगाला कळेल असत…

Read More

जामखेड पहिल्या तर कर्जत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार कर्जत / जामखेड | कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके पूर्वी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जायचे. परंतु आता ही ओळख पुसली जाऊन या ना त्या कारणाने कर्जत-जामखेड तालुके राज्यस्तरावर आपले नावलौकिक मिळवत आहेतच. शिवाय नुकतेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये जामखेड व कर्जत जिल्हा स्तरावर अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर आले आहे. रोजगार हमी योजना राबवण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटविकास अधिकारी यांचा गुणगौरव समारंभ यशवंतराव चव्हाण केंद्र नरिमन पॉईंट येथे राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व कर्जत येथील गटविकास अधिकारी श्री.…

Read More

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या निवडीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश आहे. निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणुक आयुक्तांच्या निवडीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आयुक्तांच्या निवडीसाठी समिती नेमणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्टाने दिली आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि CJI यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आता निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते सरन्यायाधीश यांची समिती राष्ट्रपतींकडे शिफारस करणार आहे. सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करत होते. न्यायमूर्ती केएम जोसेफ…

Read More

जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार नटून-थटुन जमले सारे,गाणे वाजते,बक्षीस मिळतेस्पर्धांचा या डौलच न्यारा,शिक्षक सारे प्रसन्न हसतीम्हणुनी शाळा नंदनवन भासते ! या उक्तीप्रमाणे प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणदर्शनाने, जामखेड शहरातील बिड रोड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन आदित्य गार्डन च्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे व सौरभ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. या वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांच्या मनात दडलेल्या सुप्त प्रतिभेला नवे वळण देऊन काहीतरी नावीन्यपूर्ण घडविण्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न करावा असे मत गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी व्यक्त केले.…

Read More

कवीवर्य कुसुमाग्रज उर्फ श्री.वि.वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस तसेच मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज सर्वधर्मसमभाव साहित्य व सांस्कृतिक मंच आणि लोकशाही विचारधारा साहित्य मंच चे आँनलाईन प्रथम कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्राप्रती अभिमान दर्शविणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने झाली. हे गीत समूह प्रशासिका कवयित्री वैशाली सुर्यवंशी यांनी त्यांच्या मधूर आवाजात सादर केले. सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, निर्माता दिग्दर्शक, लावणीकार तसेच समूह संस्थापकिय अध्यक्ष मा.देविदास गायकवाड यांनी त्यांच्या भाषणात, मराठी भाषेला योग्य न्याय मिळून जागतिक दर्जा मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले आदरणीय श्री.रविंद्र गिमोणकर सर यांनी समूहाचे आणि विविध उपक्रमांचे खूप कौतुक…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे राज्य कोअर कमिटीचे सदस्य व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. श्री. नानासाहेब टेंगले, यांच्या नेतृत्वाखाली दौड शहर पदाधिकारी यांनी दौड शहरात नागरिकांना शौचालय नाहीत म्हणून होणारी गैरसोय आणि कचऱ्याचे साचणारे ढिगारे या प्रश्नासाठी तहसीलदार आणि नगरपरिषदेतील अधिकारी यांना धारेवर धरले . तहसीलदार पाटील साहेब आणि नगराध्यक्ष पदाधिकारी यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शहराध्यक्ष रवी बंड, महिला अध्यक्ष सौ. प्रतिभा डेंगळे, उपाध्यक्ष मयूर उदावन्त, योगिता जाधव ,कार्याध्यक्ष राहुल मदने, दुर्गा सुरवसे, सचिव नीना जोसेफ, प्रसिद्ध प्रमुख आकाश अंकुश, सोनल कसुरे, संघटक श्वेता रायकर , दीपाली सोनवणे, मीनल…

Read More

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार महाराष्ट्रातील माळी समाजाच्या प्रश्नावर मंथन करण्यासाठी सावता परिषदेचे त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाज मेळाव्याचे आयोजन शनिवारी दि.४ मार्च रोजी अहमदनगर येथील टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स या ठिकाणी करण्यात आले आहे.या अधिवेशनास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती व सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन माळी समाज मेळावा पार पडत असून या मेळाव्यास जामखेड तालुक्यातील सावता सैनिक व तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगर जिल्ह्याचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष मोळकर,सावता परिषद तालुकाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी केले आहे. राज्यातील माळी समाज संघटित करण्याचे काम सावता परिषदेच्या झेंड्याखाली होत…

Read More

जामखेड-कर्जत : कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत पावलेल्या ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विम्याच्या मुद्द्यावर आमदार प्रा राम शिंदे यांनी 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून आवाज उठवला आहे. सरकारकडून या मुद्यावर सकारात्मक उत्तर देण्यात आले आहे. जे कर्मचारी कर्तव्य बजावताना कोरोना काळात मृत झाले त्यांच्या वारसांना सानुग्रह मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून राज्यातील ग्रामविकास विभागाच्या 200 कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाखाची मदत होणार आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रा राम शिंदे यांनी राज्यातील ग्रामविकास विभागाची कोविड विमा प्रकरणे प्रलंबित असल्याच्या मुद्द्यांवर तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. यावर ग्रामविकास मंत्री गिरीश…

Read More

मुंबई : फेब्रुवारी महिना संपायला दोन दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. यानंतर मार्च महिना येणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून काही नियम बदलले जातात, त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. यावेळी देखील 2000 रुपयांची नोट, एलपीजीची किंमत आणि ट्रेनच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल होणार आहेत. आज आपण याच बदलांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. ▶ 2000 रुपयांची नोट1 मार्चपासून ग्राहकांना इंडियन बँकेच्या एटीएममधून 2,000रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावे लागेल. या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना बँकेने सांगितले की, एटीएममधून 2000 रुपयांची नोट काढल्यानंतर ग्राहक शाखेत येतात आणि त्याचे सुट्टे घेतात. हे थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ▶…

Read More

जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार जामखेड शहरातील ल.ना.होशिंग विद्यालय येथे आज रोजी ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा ठेवा पुढील पिढीला माहिती होण्याकरिता प्राचार्य श्रीकांत होशिंग सर यांच्या संकल्पनेतून यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये लोकगीते, संत साहित्य , देवीची गीते, भारूड, गौळण, वासुदेव, शेतकरी गीत, पोवाडा इ. पारंपरिक लोकगीते विद्यार्थ्यांनी सादर केली. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, सर्व संचालक मंडळ व मुख्याध्यापक प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे, माजी…

Read More