महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी धनराज पवार राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाचे आ. रोहित पवार यांच्या वतीने कर्जत शहरात आयोजन; खा. शरदचंद्रजी पवार साहेब राहणार उपस्थित कर्जत | गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन कर्जत शहरात करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आयोजित करून महाराष्ट्राची बैलगाडी शर्यतीची असलेली परंपरा जोपासण्यासाठी आणि जपण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले होते व त्याला संपूर्ण राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला होता. गेल्या काही वर्षांपासून बैलगाडी शर्यत ही…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज: संपादक- सचिन कांबळे जामखेड/कर्जत: १४ फेब्रुवारी 2023 रोजी जामखेड शहरातील नगर रोड येथील पुढारी वडाच्या झाडाची (वटवृक्ष) पुजा बिभिषण (मामा )धनवडे नगरसेवक तथा जामखेड शहर अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक डाँ ज्ञानेश्वर झेंडे,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, अनिल यादव ,गणेशशेठ डोंगरे,शिवकुमार डोंगरे, वैभवशेठ कार्ले,भाऊ काशिद, अर्जुन म्हेत्रे, रविंद्र कडलग, भरत राळेभात, सचिन भंडारी,बंडू ढवळे आदी उपस्थित होते. या पुढारी वडापासून अनेक जणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत, तसेच या वडापासून अनेकांचे राजकारण सुरू झाले आहे. व कित्येक जणांचे राजकारण संपुष्टात पण आले आहेत, तर कित्येक कार्यकर्ते कर्जबाजारी पण…
महालोकवाणी न्यूज: कोरोनानंतर अनेक लोक डिजिटल खरेदी आणि पेमेंटकडे वळली आहेत. त्यामुळे आता बऱ्यापैकी देवाणघेवाण ही डिजिटल पेमेंट म्हणजे Upi Payment द्वारे किंवा पेटिएमद्वारे केली जाते. आता Upi Payment द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पेमेंट करण्याची पद्धत बदलली असून आता सारखा पिन अपलोड करावा लागणार नाही. युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरला जाणारा डिजिटल पेमेंट मोड म्हणून उदयास आला आहे. लहान UPI पेमेंट सोयीचे करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सप्टेंबर 2022 मध्ये UPI Lite वैशिष्ट्य सांगितली आहेत. आता पेटीएमनेही हे फीचर आपल्या यूजर्ससाठी आणले आहे. या फीचरची खास गोष्ट म्हणजे 200 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे. कात्रज तालुका करमाळा येथे भिमा ( Bhima) नदीचे किनारी पुरातन काळातील दगडी हेमाडपंथी निळकंठेश्वशराचे मंदिर असून येथे दर्शनासाठी महिला भगिनींनी चक्क चार किलो मिटर पाण्यातून होडीने जाऊन घेतले दर्शन या मंदिरात भगवान शंकर महादेव यांचे पदस्पर्शाने हि भूमी पावन झालेली आहे. पुर्वी येथे पिंपळाचे झाड होते याच झाडाचे पान तोडले की त्याचे सोने होत होते असे जुनी लोक सांगत होती असे सरपंच हंडाळ यांनी सांगितले. येथे चिलीया बाळाची कथा घडली होती म्हणून या मंदिरा ला अनन्य साधारण महत्त्व आहे. व येथे चिलीया बाळाची मुर्ती देखील आहे. या गावातुन जुनी रेल्वे देखील जात होती या ठिकाणी…
महालोकवाणी न्यूज मुंबई : मुंबई पोलिस दलासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये एका २६ वर्षीय उमेदवाराने मैदान पूर्ण करत प्राण सोडल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. गणेश उगले असे मृत उमेदवाराचे नाव असून १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला उगले मुंबई पोलिस दलातील शिपाई भरती प्रक्रियेत चुलत भावाबरोबर सहभागी झाला होता. शुक्रवारी सकाळी तो कलिना विद्यापीठाच्या मैदानावर चाचणीसाठी उतरला. त्याने १६०० मीटरची चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडल्यानंतर लगेचच जमिनीवर कोसळला. पोलीस भरती ( police Bharati) प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय…
जामखेड। धनराज पवार जामखेड (Jamkhed )शहरातील नगर रोड येथील पुढारी वड काही दिवसांपूर्वी काढण्यात आला होता.अनेक वर्षापासून पुढारी वड इतिहासाची साक्ष होता. राजकीय, सामाजिक सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र राहिले होत, अनेक संकटामध्ये पुढारी वड कायम तग धरत,पुढारी वड महामार्गा च्या कामा मध्ये निघाला असून लोकभावना जागृत झाली असून वड निघाल्यामुळे लोक हळहळ व्यक्त करू लागले . आमदार रोहित पवार यांनी याच भावना जाणत त्यांच्या संकल्पनेतून पुढारी वडा ला पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले.पुढारी वड पुन्हा: त्याच जोमाने पुढील काळात राहिल. तसेच पुणे येथून तज्ञ टिम बोलावून पुढारी वडाची पुनर स्थापना करण्यात आली.आज रोजी विंचारणा नदीच्या काठी महाशिवरात्री च्या शुभ मुहूर्तावर शहर राष्ट्रवादी काँग्रेस…
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला शिवसेना नावासह “धनुष्य बाण ‘ चिन्ह मिळाले असून आज रोजी जामखेड शहर शिवसेनेच्या वतीने खर्डा चौक येथे तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडूनआनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी शहराध्यक्ष देविदास भादलकर, युवा सेना तालुका प्रमुख सुमित वराट, मुस्तफ़ा शेख मेजर, हसनभाई तांबोळी ,मोहसिन सय्यद, सुधाकर समुद्र , महादेव कोल्हे, अमोल खेत्रे,बालाजी निमोणकर ,अरुण तांबे,विजय गौड,साहिल मुजावर,अनिकेतबिडकर, साहिल शेख,अल्तमश शेख,नेहाल आतार,जुनेद बागवान,मोहसिन कुरेशी,यासीर सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिक्रिया:- प्रा.कैलास माने (सर) तालुका प्रमुख – शिवसेना जामखेड तालुका वंदनीय हिंदूह्रदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व…
तालुक्यामध्ये कॉपी मुक्त अभियान; विविध आकस्मिक पथकांची निर्मिती करणार – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार सन २०२३ इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड च्या परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे.आज रोजी ल.ना.होशिंग विद्यालय येथे जामखेड तालुक्यातील सर्व परीरक्षक व केंद्र संचालक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अनुशंगाने या वर्षी कॉपी मुक्त अभियान संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये राबविण्यात येणार असून या परिक्षेसाठी वेगळे महत्व प्राप्त होणार आहे .यावर्षी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या परीक्षा कॉपी मुक्त व…
नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची बाजू ऐकून निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह वेगळा गट निर्माण केली. शिंदे गटाने शिवेसना न सोडता पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला होता. आम्हीच शिवसेना पक्ष आहोत असं ते सातत्याने सांगत होते. त्यानंतर शिवसेना नेमकी कुणाची? याची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरु होती. The Election Commission of India today ordered that the party name “Shiv Sena”…
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांचं नाव घेत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून घेऊन येतील, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. पुणे कसबा पोटनिवडणूक पार्श्वभूमीवरील मेळाव्यात ते बोलत होते. रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून प्रचारासाठी घेऊन येतील. त्यावेळी म्हटलं पाहिजे, “ओ धंगेकर आता तुम्ही महात्मा गांधींना घेऊन आलात ते आम्हाला वर्षभर नाही पुरणार”, असं चंद्रकांत पाटील यांना म्हटलं. हेमंत रासने यांना काहीही करून विजयी करायचं आहे.कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जिंकायचीच आहे, असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. चंद्रकांत पाटलांना…