Author: mahalokwani

महालोकवाणी न्यूज:- बीड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनजंय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. धनजंय मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामळे माझ्या गाडीचा लहानसा अपघात झाला आहे. यामध्ये माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी सध्या मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. या अपघातानंतर धनंजय…

Read More

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )दि. ०३/०१/२०२३. माहुर निवासिनी श्री रेणुका मातेचे साक्षात असे रूप असलेली आणी नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावुन येणारी अशी ख्याती असलेल्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीचे ग्रामदैवत व परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असलेल्या श्री बालंबिका देवीचा यात्रोउस्सव कर्करोगाशी झुंज अपयशी, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन दि. ६ जानेवारी २०२३ रोजी शुक्रवार पासून प्रारंभ होत आहे. शांकभरी पोर्णिमेला प्रारंभ होणारा हा यात्रोउस्सव तीन दिवस चालणार आहे. दोन दिवस कुस्त्यांचा जंगी हंगामा होईल. अशी माहीती देवी मंदिर ट्रस्ट व यात्रा उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे. शेकडो वर्षापासुन भरणारी ही यात्रा शेवगाव तालुक्यात प्रसिद्ध असून शुक्रवार दि. ६ जानेवारी…

Read More

जामखेड (प्रतिनिधी)जामखेड तालुक्यातील वाकी येथील पे जल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा कामात अपहार झाल्या प्रकरणी पंचायत समिती जामखेड या ठिकाणी मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे हे जामखेड तालुक्यातील कार्कर्त्यांसमवेत पंचायत समिती जामखेड कार्यालयासमोर उपोषणास बसणार होते . यासंदर्भात गटविकास अधिकारी प्रकाश पौळ यांनी दखल घेऊन आठ दिवसात वाकी गावातील दलित वस्ती सह चार वस्त्यांना पाणी पुरवठा सुरळीत होईल एक कॅच पकडला अन सामना पलटला; संपूर्ण क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, वाचा नेमकं कारण काय ? असे आश्वासन दिल्याने आर. पी. आय.चे उपोषण मागे घेण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर…

Read More

मेलबर्न : बीग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात ब्रिस्बेन हीटचा खेळाडू मायकल नेसरने पकडलेल्या झेलची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. यामुळे क्रिकेटच्या नियमावरून वाद सुरू झाला आहे. मायकल नेसरने सीमेबाहेर उडी मारून चेंडू पुन्हा आत ढकलला आणि तो आत येऊन झेलला. चाहत्यांना वाटतं की हा झेल योग्य पद्धतीने घेतला गेला नाही आणि पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद दिले. यामध्ये मेलबर्न क्रिकेट क्लबचा नियम काय आहे हे आता जाणून घेऊया. मेलबर्न क्रिकेट क्लबने बनवलेल्या नियमानुसारच क्रिकेट खेळलं जातं. ब्रिस्बेन हीटने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना जॉर्डन सिल्कने २३ चेंडूत ४१ धावा करत सिडनी सिक्सर्सला विजयाच्या जवळ पोहोचवले होते.…

Read More

नगर- दर सालाबाद प्रमाणे यंदाही नववर्षाचे स्वागत करतांना सामाजिक बांधिलकी जोपासत केवळ प्रभागापुरते जनसेवा न करता तमाम भाविक-भक्त यांना अल्पदरात शेगाव येथील गजानन महाराज दर्शनाचा लाभ देणार आहे, अशी माहिती वसंत टेकडी येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी दिली.याबाबत अधिक महिती देतांना श्री.त्र्यंबके म्हणाले की, गेल्या 9 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक तसेच भाविकांना देव-दर्शनचा लाभ मिळावा, या उद्देशाने अल्पदरात साई-यात्राचे आयोजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. ही यात्रा केवळ प्रभागापुरती मर्यादित न ठेवता शहर व परिसरातील लोकांना त्यामध्ये सामावून घेतो, त्यामुळे दरवर्षी गर्दी वाढतच राहते. यावर्षी शनिवार दि.7 जानेवारी 2023 रोजी रात्री 7 वा.…

Read More

नगर – आपण जे काम करतो ते स्वत:ला फार अवघड वाटते व समोरचा जे काम करतो ते खूप सोपे आहे, असा दृष्टीकोन प्रत्येकाचा असतो. प्रत्येक कामात कष्ट आहे, वृत्तपत्र व्यवसायात कठोर परिश्रमाशिवाय पर्यायच नसतो. या व्यवसायामुळे कष्टाची किंमत समजते. तेव्हा तर आपण चिकाटीने बचत करतो. 15 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या बालाजी स्वयं सहाय्यता बचत गट एक खूप मोठा आधार आपल्याला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते विजय मते यांनी केले. सावेडी उपनगरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या श्री बालाजी स्वयं सहाय्यता बचत गटाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी 15 वर्षे यशस्वीपणे जबाबदारी पार पाडणारे अध्यक्ष संदिप लंके व सचिव पुरुषोत्तम दोमल…

Read More

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून साथ देत नव्हती. अश्यातच पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र या दरम्यान त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनातून…

Read More

पुणे : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक होते, यावरून वाद पेटला आहे.आता या वादावर राष्ट्रवादीचे आमदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर असल्याचे पुरावे स्पष्ट नसून स्वराज्य रक्षक ही बिरुदावली व्यापक आहे’ अशी भूमिका मांडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाला खासदार अमोल कोल्हेंनी साथ दिली आहे. स्वराज्य रक्षक मालिक करत असताना मला जे जाणवलं त्यावरून बोलणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतरावर बंदी आणली होती. छत्रपती संभाजी राजे यांनी धर्मासाठी बलिदान दिलं म्हणून धर्मवीर म्हटलं जात असल्याचं काही जण सांगत आहे.…

Read More

येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये (Yerawada Jail) तीन कैद्यांचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजरामुळे झाला आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एका कैद्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. शाहरुख बाबू शेख (वय-29 रा. कोंढवा), संदेश अनिल गोंडेकर (वय-26 रा. डोणजे, हवेली), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय-32 रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत. संदेश गोंडेकर याच्यावर 2018 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तेव्हापासून तो येरवडा कारागृहात आहे. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमीतपणे जात होते. 31 डिसेंबरला त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी…

Read More

अहमदनगर (प्रतिनिधी) :येथील शहर सुधार समिती व समविचारी पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळाने आज रोजी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन शहरातील पत्रकारांवरील अन्याय दूर करत इतर प्रवाहातील पत्रकारांनाही पुरस्कार देण्यात यावेत त्यासाठी तात्काळ बैठक घेऊन पुरस्कार जाहीर करावेत व दि. ६ रोजी ते वितरण करावेत, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांना मागणीपत्र दिले. शिष्टमंडळात अहमदनगर हॉकर्स संघटनाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, सुनिल नागपुरे, ऊर्जिता सोशल फौंडेशनच्या संध्या मेढे, युनूस तांबटकर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज शेख, दिपक शिरसाठ, आम आदमी पक्षाचे रवि सातपुते, राजेंद्र कर्डीले, अरूण थिटे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव भैरवनाथ वाकळे यांचा समावेश होता. या…

Read More