नगर- दर सालाबाद प्रमाणे यंदाही नववर्षाचे स्वागत करतांना सामाजिक बांधिलकी जोपासत केवळ प्रभागापुरते जनसेवा न करता तमाम भाविक-भक्त यांना अल्पदरात शेगाव येथील गजानन महाराज दर्शनाचा लाभ देणार आहे, अशी माहिती वसंत टेकडी येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी दिली.याबाबत अधिक महिती देतांना श्री.त्र्यंबके म्हणाले की, गेल्या 9 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक तसेच भाविकांना देव-दर्शनचा लाभ मिळावा, या उद्देशाने अल्पदरात साई-यात्राचे आयोजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. ही यात्रा केवळ प्रभागापुरती मर्यादित न ठेवता शहर व परिसरातील लोकांना त्यामध्ये सामावून घेतो, त्यामुळे दरवर्षी गर्दी वाढतच राहते. यावर्षी शनिवार दि.7 जानेवारी 2023 रोजी रात्री 7 वा.…
Author: mahalokwani
नगर – आपण जे काम करतो ते स्वत:ला फार अवघड वाटते व समोरचा जे काम करतो ते खूप सोपे आहे, असा दृष्टीकोन प्रत्येकाचा असतो. प्रत्येक कामात कष्ट आहे, वृत्तपत्र व्यवसायात कठोर परिश्रमाशिवाय पर्यायच नसतो. या व्यवसायामुळे कष्टाची किंमत समजते. तेव्हा तर आपण चिकाटीने बचत करतो. 15 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या बालाजी स्वयं सहाय्यता बचत गट एक खूप मोठा आधार आपल्याला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते विजय मते यांनी केले. सावेडी उपनगरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या श्री बालाजी स्वयं सहाय्यता बचत गटाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी 15 वर्षे यशस्वीपणे जबाबदारी पार पाडणारे अध्यक्ष संदिप लंके व सचिव पुरुषोत्तम दोमल…
पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून साथ देत नव्हती. अश्यातच पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र या दरम्यान त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनातून…
पुणे : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक होते, यावरून वाद पेटला आहे.आता या वादावर राष्ट्रवादीचे आमदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर असल्याचे पुरावे स्पष्ट नसून स्वराज्य रक्षक ही बिरुदावली व्यापक आहे’ अशी भूमिका मांडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाला खासदार अमोल कोल्हेंनी साथ दिली आहे. स्वराज्य रक्षक मालिक करत असताना मला जे जाणवलं त्यावरून बोलणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतरावर बंदी आणली होती. छत्रपती संभाजी राजे यांनी धर्मासाठी बलिदान दिलं म्हणून धर्मवीर म्हटलं जात असल्याचं काही जण सांगत आहे.…
येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये (Yerawada Jail) तीन कैद्यांचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजरामुळे झाला आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एका कैद्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले त्यावेळी त्यांना मुलाचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. शाहरुख बाबू शेख (वय-29 रा. कोंढवा), संदेश अनिल गोंडेकर (वय-26 रा. डोणजे, हवेली), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय-32 रा. मोरगाव, बारामती) असे मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत. संदेश गोंडेकर याच्यावर 2018 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तेव्हापासून तो येरवडा कारागृहात आहे. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमीतपणे जात होते. 31 डिसेंबरला त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी…
अहमदनगर (प्रतिनिधी) :येथील शहर सुधार समिती व समविचारी पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळाने आज रोजी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन शहरातील पत्रकारांवरील अन्याय दूर करत इतर प्रवाहातील पत्रकारांनाही पुरस्कार देण्यात यावेत त्यासाठी तात्काळ बैठक घेऊन पुरस्कार जाहीर करावेत व दि. ६ रोजी ते वितरण करावेत, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांना मागणीपत्र दिले. शिष्टमंडळात अहमदनगर हॉकर्स संघटनाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, सुनिल नागपुरे, ऊर्जिता सोशल फौंडेशनच्या संध्या मेढे, युनूस तांबटकर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज शेख, दिपक शिरसाठ, आम आदमी पक्षाचे रवि सातपुते, राजेंद्र कर्डीले, अरूण थिटे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव भैरवनाथ वाकळे यांचा समावेश होता. या…
मुंबई : 2022 मध्ये या अभिनेत्रीला वादग्रस्त पोस्टमुळे जेलमध्ये जावं लागलं होतं. संपूर्ण वर्षभर ती प्रचंड चर्चेत होती. केतकीला काही महिन्याआधीच तिच्या फेसबुकचे अक्सेस परत देण्यात आले. अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिची मतं सोशल मीडियावर मांडत असते. त्यानंतर केतकी सोशल मीडियावर प्रामुख्यानं फेसबुकवर सक्रीय झाली. मात्र नंतर केतकीच्या सोशल मीडिया पोस्ट पुन्हा चर्चेत येऊ लागल्या. दरम्यान 31 डिसेंबरला केतकीनं शेअर केलेल्या व्हिडीओनं पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. केतकी नेटकऱ्यांच्या पुन्हा निशाण्यावर आली आहे. इतकंच नाही तर नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला केतकीनं उत्तर देखील दिली आहे. View this post on Instagram A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen) केतकीनं फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर…
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाजवळ राजिंदर पार्कमध्ये बॉम्बचा शेल सापडला आहे. त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर हेलिपॅड आहे, तिथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरते. बॉम्ब मिळाल्याच्या वृत्ताने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचे पथक, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी आले. चंडीमंदिरातील लष्करालाही माहिती देण्यात आली आहे. लष्कराचे बॉम्ब निकामी करणारे पथक येथे पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ राजिंदर पार्कमध्ये बॉम्बचा शेल सापडला आहे. हा बॉम्बचा शेल राजिंद्र पार्कमधील आंब्याच्या बागेत पडून होता. हे क्षेत्र यूटीच्या अखत्यारीत येते. दुपारी काही प्रवासी येथे गेले. त्यांना बॉम्बसारखे काहीतरी दिसले. ज्याची माहिती त्यांनी तत्काळ पोलिसांना १०० क्रमांकावर…
सांगली : राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस जोडावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Union Social Justice Minister Ramdas Athawale) यांनी लगावला आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस कोसळणार नाही. उलट 2024 पर्यंत स्थिर राहील, आणि पुन्हा सत्तेमध्ये देखील येईल, असा विश्वास देखील मंत्री आठवले यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार, असे संजय राऊत बोलत आहेत. मात्र आमच्या सरकारकडे 164 चे बहुमत असून सरकार पडण्याची भीती नाही. त्यामुळे 2024 पर्यंत कार्यकाळ पूर्ण करतील, त्यानंतर…
रौप्य महोत्सवी कांकरिया करंडक राज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव विजेता नाट्य संघ सप्तरंग थिएटर्स अहमदनगर तर उपविजेता नाट्य संघ नाट्यअराधना अहमदनगरअभिनेत्री निशागंधा वाड यांच्या हस्ते पारितोषीक वितरण महालोकवाणी न्यूज ता. २ भविष्याचे स्वप्न घडवण्यासाठी कांकरिया करंडक सारख्या व्यासपिठीची गरज आहे. राज्यातील बाल कलाकरांना घडवण्यासाठी गेली २५ वर्ष कांकरिया करंडक हा उपक्रम राबवत असून यातून हजारो कलावंत घडत गेले, मी कांकरिया करंडकाचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन करते. सध्याची पिढी खूप धिट आहे. या मुखवट्यांच्या जगात तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता. स्वताःशी स्पर्धा करा, यश, अपयश तितक्याच सहजपणे स्विकारा असे मत सिने अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांनी कांकरिया करंडकच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या पारितोषीक वितरण प्रसंगी…