पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे. सिद्धेश्वर हॉलीबॉल क्लब खानवटे तालुका दौंड यांनी ता 01/01/2023 रोजी भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे . या स्पर्धेसाठी बाहेरील जिल्ह्यातून ऐकूण 16 संघ दाखल झाले .होते या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन आणि माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी. केले त्यांच्या समवेयत दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम आप्पा आटोळे माजी उपसभापती प्रकाश बापू नवले हेही उपस्थित होते त्यांचा सत्कार खानवटे गावच्या सरपंच सौ जया ताई खुटाळे यांनी केला. या स्पर्धेसाठी अनुक्रमे बक्षीस प्रथम क्रमांक 7000//5000//3000//2000// 1000 रुपयांची ऐकुण पाच बक्षिसे ठेवण्यात आली होती .जेजुरी संघाने प्रथम पारितोषिक सात हजार रुपये…
Author: mahalokwani
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे चक्क मुलाने आपल्या जन्मदात्या पिताला पेटवून मारून टाकले असल्याची घटना घडली आहे. हे हत्या प्रकरण एका प्रेम प्रकरणातून घडले. यामध्ये मयत अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यानी दिली. तीन अल्पवयीन मुलांच्या आईचे अफजल बागवान यांच्याशी प्रेमसंबंध होते. तर तीन अल्पवयीन मधील एका मुलीचे अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र अफजलला सोहेलचे आणि संबंधित अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध अमान्य होते. New Year 2023 : न्यूझीलँडने नव्या वर्षाचं केलं जल्लोषात स्वागत; जाणून घ्या जगात पहिल्यांदा कुठे साजरं होतं नववर्ष? यातूनच प्रेयसीने…
महालोकवाणी न्यूज नव्या वर्षाचा उत्साह सुरु असताना महाराष्ट्रात दोन दुर्देवी घटना समोर आल्या आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात जिंदाल कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कंपनीत आग लागली. ही आग विझवण्याचं काम अजून सुरुच असताना सोलापुरातून आणखी एक अतिशय वाईट आणि दुर्देवी घटना समोर आलीय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झालाय. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जातेय. संबंधित घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. संबंधित घटना ही बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ घडलीय. कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचं काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. या कारखान्यात 40 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते, अशी प्राथमिक माहिती मिळत…
नगर – सामाजिक क्षेत्रात काम करतांना समाजसेवेचे व्रत म्हणून काम केले पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटतात. बारा बलुतेदार महासंघाने जिल्ह्यातील समाजासाठी भरीव काम केले. या संघात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नूतन पदाधिकार्यांनी पदाचा उपयोग हा समाजहितासाठी करावा, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अमेरिकेत कोरोनाचा धोकादायक XBB15 व्हेरिएंट आढळला ! सावेडी उपनगरात बारा बलुतेदार महासंघाच्या संपर्क कार्यालयात नवीन वर्षानिमित्त काही नवीन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. या सर्वांचा सत्कार आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, उपाध्यक्ष अनिल इवळे, शहराध्यक्ष शाम औटी,…
Kisan Vikas Patra: शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळावा यासाठीही सरकारकडून पावले उचलली जात आहेत. त्याचवेळी मोदी सरकारने नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. New Year 2023 : न्यूझीलँडने नव्या वर्षाचं केलं जल्लोषात स्वागत; जाणून घ्या जगात पहिल्यांदा कुठे साजरं होतं नववर्ष? ▶ शेतकऱ्यांसाठी योजना किंबहुना, शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळवून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना बचतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक योजनाही सरकारकडून राबवली जात आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या योजनेचे नाव किसान विकास पत्र आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक बचत योजना चालवल्या जात आहेत.…
New Year 2023 : भारतात नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी काही तास शिल्लक बाकी आहेत. मात्र, जगातील काही देशात नव्या वर्षाचा जल्लोष सुरू झाला आहे . जगातील सामोआ, टोंगा, किरिबाती या देशात सर्वात आधी नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. या देशानंतर इतर देशात नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! जगात नववर्ष स्वागत करण्याचा दुसरा क्रमांक न्यूझीलँड देशाचा लागतो. यंदाही न्यूझीलँडने नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. शनिवारी न्यूझीलँडमधील नागिराकांनी जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं आहे. नागरिकांपासून लहान मुलेहीमध्ये नववर्षाचा जल्लोष करताना दिसत आहे. ३१ डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार ३:३० वाजता सामोआ, टोंगा, किरिबाती या देशात सर्वात…
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा XBB15 हा एक नवा व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. जो अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत खूप धोकादायक आहे. चीनी वंशाचे अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ एरिक फीगेल डिंग यांचे म्हणणे आहे की, हा व्हेरिएंट पूर्वीच्या BQ1 प्रकारापेक्षा १२० पट वेगाने संसर्ग पसरवतो. पूर्वीच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा मानवी रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यात तो अधिक पटाईत आहे. सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका; रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक ! आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, नवीन प्रकारानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तर याचे प्रमाण कमी होणार नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन सारखे नसून ते एक विशेष रीकॉम्बिनेशन आहे. जे…
ठाणे : ठाणे पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरात हे वेश्या व्यवसाय सुरू होते. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्स रॅकेटमधून दोन २५ वर्षीय अभिनेत्रींची ठाणे पोलिसांनी सुटका केली आहे. या अभिनेत्री मराठी आणि हिंदी मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करत होत्या. याप्रकरणात पोलिसांनी एका दलालाला अटक केली आहे, ज्याने या दोघींना या सेक्स रॅकेटमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला. तर या प्रकरणी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. ऋषभ पंतच्या अपघातानंतर भडकली रोहित शर्माची पत्नी; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क ! ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील यांनी या घटनेविषयी…
नगर – आपण ज्या गोष्टींची अपेक्षा करतो ती पूर्ण होणे म्हणजे समाधान आणि अपेक्षापूर्ती नंतर जो काही आपल्या मनातून हर्ष होतो, तो म्हणजे आनंद आणि हे साध्य करण्यासाठी साईबाबांवर असलेली श्रद्धा, सबुरीचे फळ म्हणजे आशिर्वाद हा एक कृपाप्रसादच असतो, असे प्रतिपादन प्रथमेश गोरे यांनी केले. वसंत टेकडी येथील संदेशनगर मधील द्वारका साई मंदिरात 2022 वर्षाला निरोप देण्यासाठी भजन संध्या व नवदांम्पत्यांच्या हस्ते आरती व महाप्रसाद असा उपक्रम साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला. यावेळी श्री.गोरे बोलत होते. काय सांगता; देशातील कोणत्याही ठिकाणाहून आता करता येणार तुमच्या मतदारसंघात मतदान ? याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल त्र्यंबके, योगेश पिंपळे, बबलू…
महालोकवाणी ता.31 भाजपचे आमदार योगेश सागर यांनी शुक्रवारी विधानसभेत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे नाव घेऊन त्यांच्याशी संबंधित संस्थेवर युवकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चौकशीचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही,विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सागर यांनी वरुण सरदेसाई आणि रुपेश कदम यांच्याशी संबंधित हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड या संस्थेकडून झालेल्या बेरोजगार तरुणांच्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. हिंदुस्थान स्काऊट अँड गाइड ही संस्था शासनमान्य असल्याचे भासवून गरीब तरुणांकडून नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखो रुपये उकळले. पंतच्या अपघातानंतर भडकली रोहित शर्माची पत्नी; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क ! कुटुंबांनी…