भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे. दरम्यान, त्याच्या अपघाताचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता यावर कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने संताप व्यक्त केला आहे. काय सांगता; देशातील कोणत्याही ठिकाणाहून आता करता येणार तुमच्या मतदारसंघात मतदान ? रितिका सजदेह हिने तिच्या इंस्टाग्रामी स्टोरीमध्ये लिहिले की, ‘एखाद्या जखमी, असणाऱ्या व्यक्तीला त्याचे अपघातातील फोटो पोस्ट करायचे आहेत की नाही हे…
Author: mahalokwani
शहरी भाग आणि तरुणाई यांच्यात असलेला मतदानाचा निरुत्साह कमी करणे आणि सर्व नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोग रिमोट एव्हीएमच्या प्रोटोटाईपची चाचणी करत आहे.१६ जानेवारीला होणाऱ्या या चाचणीसाठी देशातील सर्व आठ राष्ट्रीय राजकीय पक्ष आणि ५८ प्रादेशिक पक्षांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. या चाचणीच्या वेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! अनेकदा निवडणुकांसाठी मतदान होत असताना मतदार काही कारणांनी आपल्या मतदान क्षेत्रात नसतात.अश्यावेळी त्यांना मतदान करता येत नाही. नव्या रिमोट ईव्हीएम मुळे ही अडचण दूर होणार आहे आणि मतदार देशात जेथे…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30/ 12/ 2022 रोजी संपन्न झाली कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी विषय पत्रिकेवरील.विषय वाचून दाखवले.कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल म्हणाले की भीमा पाटस सभासदांचे मालकीचा राहील राजकारण विरहित संस्था चालू ठेवण्याचा आमचा काटेकोर प्रयत्न आहे या संस्था सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित भाई शहा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस.यांनी कारखाना सुरू करण्यासाठी फार मोठी मदत केली आहे विविध प्रकारच्या विकास कामांसाठी तेराशे कोटी रुपयांचा निधी आणण्याचा माझा प्रयत्न आहे दौंड तालुका हा प्रगल्भ तालुका म्हणून याची ओळख झाली पाहिजे असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे या…
सोनई (वार्ताहर) मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय, सोनई संघाने आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत भरघोस यश मिळवले. कृषि महाविद्यालय, धुळे या ठिकाणी झालेल्या अविष्कार २०२२ स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी अथर्व दांगट याने दुसरा क्रमांक मिळविला.त्याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे या ठिकाणी होणाऱ्या आंतर विद्यापीठ अविष्कार स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संघामध्ये निवड झाली.त्याला प्रा. सोमनाथ दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले. जवाहरलाल नेहरू कृषि विद्यापीठ, जबलपूर (मध्यप्रदेश) याठिकाणी झालेल्या आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत ज्ञानेश्वर गोंडे याने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संघाचे प्रतिनिधित्व केले. कृषि महाविद्यालय, मिरजगाव येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजनी गटात सागर कोल्हे याने रजतपदक मिळविले. त्याचीदेखील…
भारतीय क्रिकेट संघातील युवा क्रिकेटपटू आणि विकेटकीपर ऋषभ पंत याच्या गाडीला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रुडकी येथील नारसन बॉर्डरवर हम्मदपूर झाल जवळ त्यांची गाडी रेलिंगला धडकली. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. पायाला फॅक्चर देखील असल्याचे समजते. अपघातावेळी पंत स्वत: गाडी चालवत होता अशी प्राथमिक माहिती मिळते.तसेच त्याच्यासोबत काही मित्र देखील होते पण त्याबाबत अधिक काही माहिती मिळाली नाही. अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने रुकडी येथील सिव्हिल रुग्णालयात पंतला दाखल केले. अपघाताचे वृत्त कळताच पोलिस अधिक्षक किशोर सिंह घटनास्थळी दाखल झाले.
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे हिवाळी। अधिवेशन नागपूर – २०२२ : धनगर आरक्षणासाठी केंद्र व राज्य शासन सकारात्मक असून धनगर आरक्षण लागू होई पर्यंत राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भरीव निधीची तरतूद करावी तसेच ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या तरुण मुलांना उद्योगाच्या संदर्भामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवाव्यात अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली…
मुंबई : विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात चांगलीच फटकेबाजी केली जातेय. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात आले होते. या सगळ्या घडामोडी सुरु असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वाची घोषणा केलीय. नववर्षात मनरेगा योजनेत होणार मोठा बदल ; 1 जानेवारीपासून हा नियम लागू होणार ! निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर केलीय. येत्या 30 जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार…
पुणेः लावणी नृत्यंगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडून मात्र त्यांना संरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावर अश्लिलतेचा आरोप ठेऊन प्रस्थापित कलाकारांकडून विरोध आणि बंदीची मागणी होत असताना गौतमी पाटील यांनी टीव्ही नाईनशी बोलताना आपली स्पष्ट भूमिकाच मांडली. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! गौतमी पाटील यांनी आपल्या कार्यक्रमावर अश्लिलतेचा आरोप केला जात आहे. मात्र तो आरोप का केला जात आहे याची मला खरचं माहिती नाही असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तमाम महाराष्ट्राची माफी मागून सांगितले की, मागे जे कार्यक्रम झाले त्यामध्ये माझी चूक…
येत्या दोन दिवसात 2022 समाप्त होईल आणि नववर्षाला सुरुवात होणार आहे. नववर्षात अनेक बदल देखील होणार आहेत. अनेक शासकीय योजनेमध्ये देखील बदल केले जाणार आहेत. मनरेगा अर्थातच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत देखील एक जानेवारीपासून अर्थातच नववर्षात मोठा बदल होणार आहे. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! अशा परिस्थितीत आज आपण या योजनेत नेमका कोणता बदल होणार आहे? या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यामुळे फायदा होईल की तोटा होईल यांसारख्या बाबींचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हाती आलेल्या माहितीनुसार एक जानेवारीपासून या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजूर वर्गाला आता डिजिटल…
जामखेड तालुक्यातील मौजे वाकी येथे पेजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा कामात अपहार झाल्या प्रकरणी जामखेड पंचायत समिती कार्यालय समोर 3 जानेवारी 2023 रोजी उपोषणास बसण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिला आहे. त्यांनी वाकी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी होणे संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड ,तहसीलदार जामखेड ,यांना निवेदन दिले होते. परंतु ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे मंगळवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता ते कार्यकर्त्यांसह उपोषणास बसणार आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की., वाकी गावातील दलित वस्तीसह…