Author: mahalokwani

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे१. अर्ज ( विहीत नमुन्यात)२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय…

Read More

नगर. ता. 19 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय. रामदासजी आठवले साहेब यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेस मागे घेण्यात यावेत, जसे मराठा मोर्चातील केसेस मागे घेतले आहेत, त्याप्रमाणे भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घेण्यात यावी यासाठी आठवले साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे. 1 जानेवारी हा संघर्ष दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून भीम अनुयायी हे कोरेगाव भीमा येथे येत असतात महार समाजाच्या इतिहासाची आठवण म्हणून सर्वजण जमा होत असतात .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याची सुरुवात केली होती . आता अलीकडच्या काळामध्ये बरेच राजकीय पक्ष या ठिकाणी सभा घेतात यातूनच काही अनुसूचित प्रकार घडतात हे…

Read More

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनावर दिनांक २३ डिसेंबर रोजी नागपूरात विराट मोर्चा. महाराष्ट्र विधानसभा आगामी हिवाळी अधिवेशन संत्रानगर नागपूरात दिनांक १९ डिसेंबर २०२२ पासून सुरू होत असून दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने राज्यातील जनतेच्या ज्वलंत महत्वपूर्ण प्रश्नावर विराट मोर्चा चे आयोजन केले असून संपूर्ण राज्यभरातून जवळपास ५० हजार बी. आर. एस. पी. समर्थक नागपूरात या मोर्चासाठी धडकणार आहेत. या मोर्चाचे नियोजन म्हणजे या मोर्चासाठी एकटया नागपूर जिल्हातून दहा हजार व उर्वरित जिल्हयातून १५००० असे एकूण २५००० तर मराठवाडयातून एकूण १५००० व उर्वरित मुंबई कोकण, उत्तर महाराष्ट्र या विभागातून १५०००, असे एकूण ५०…

Read More

राज्य सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. लोकायुक्त कायद्यामुळे महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. चांगला निर्णय घेतल्याबाबत मी त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना सांगितले की, तुम्ही जो कायदा करत आहात त्याचे महत्त्व तुम्हाला आज कळणार नाही. कायदा झाल्यावर लोक जेव्हा त्या कायद्याची अंमलबजावणी करतील, तेव्हा तुमच्या लक्षात येईल हा निर्णय किती क्रांतिकारक आहे. माहिती अधिकार कायद्याच्यावेळी लोकांनी मला वेड्यात काढले होते. आता त्यांना माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व कळते, असे मी त्यांना सांगितल एका बाजूला फडणवीसांनी आम्हाला आश्वासन…

Read More

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.19, वाढदिवसानिमित्त थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, मित्रजनांचे सहकार्य तसेच कार्यकर्ते व समर्थकांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आयोजित अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी केले. तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, माजी माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, माजी जि.प.सभापती किशोर बलांडे, अशोक सूर्यवंशी, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, सिल्लोड न.प.गटनेता नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, डॉ. मच्छिन्द्र पाखरे, जिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या…

Read More

दोन वर्षांनी कोरोनातून नुकताचं कुठं सुटकेचा श्वास मिळाला असतांना आता काही देशात एक व्हायरस पाय पसरू लागला आहे. कतारमध्ये सुरू झालेल्या फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी जगभरातून लाखो फुटबॉल चाहते गेले होते. अशातच कतारहून परतणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना डॉक्टरांनी कडक इशारा दिला. परतणारे चाहते हे उंटांमध्ये आढळणारा घातक ‘कॅमल फ्लू’ पसरवू शकतात असं त्यांनी म्हटल आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, कॅमल फ्लू’ हा रोग आहे तरी काय? त्याची लक्षणे काय आहेत? याच विषयी जाणून घेऊ. कॅमल फ्लू म्हणजे काय? कॅमल फ्लू हा एक प्रकारचा व्हायरस आहे. जो उंटांपासून मानवांमध्ये पसरतो. ज्या देशांमध्ये उंटांची संख्या जास्त आहे,…

Read More

अत्यंत थरारक चुरशीची फायनल मॅच मध्ये अर्जेंटिना विश्वविजेता अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये खेळलेल्या फायनल मॅच मध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउट मध्ये फ्रान्स वर मात करून विश्वविजेत्या पदावर आपले नाव कोरले, अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा हा फुटबॉलचा विश्व कप जिंकला आहे.मॅचच्या सुरवातीपासून अर्जेंटिनाने आक्रमक खेळाला सुरुवात केली, पहिल्या 45 मिनिटाच्या हाफ टाईम मध्ये फ्रान्स वर 2 गोल करून विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केली. परंतु फुटबॉल हा असा खेळ आहे की शेवटच्या मिनिटाला काय होईल हे सांगता येत नाही, आणि तेच या मॅच मध्ये पहावयास मिळाले.दुसऱ्या हाफ टाईममध्ये 80 मिनिटापर्यंत अर्जेंटिना 2-0 गोलने पुढे असताना अचानक फ्रान्सने 84 मिनिटाला पहिला गोल केला व 86 व्या मिनिटाला…

Read More

नगर ता. 18 पोलीस भरतीची सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिंदे व फडणवीस सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे, बऱ्याच दिवसापासून नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या युवकांसाठी हा आनंदचा क्षण म्हणावा लागेल. पहिल्यांदा चालक पदासाठी मैदानी होईल, त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. रोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल. जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन 22 डिसेंबरपर्यंत पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे. अशी असणार मैदानी चाचणी*उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाईल. एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज भरलेल्या उमेदवारांना कुठे परीक्षा द्यायची हे ठरवावे लागेल. कोणालाही दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी चाचणी घेतली जणार आहे.…

Read More

महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतची मुदत संपून आज महाराष्ट्रातील 7721 ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात झाली आहे या मतदान प्रक्रिया मध्ये सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिष्ठा पणाला लागली असून गाव पातळीवरील सर्व कार्यकर्ते व युवक वर्ग यांना या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेताना दिसत आहे त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुका मध्ये चांगलीच रंगत येतांना दिसत आहे अलीकडील राजकीय घडामोडी तसेच नवीन आलेले शिंदे फडणवीस सरकार, महाविकास आघाडी यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आमने सामने लढत होताना दिसत आहे. गाव पातळ वरील ग्रामपंचायत निवडणूक असली तरी येणाऱ्या लोकसभा- विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष हे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी येईल या दृष्टीने प्रयत्न करतांना दिसत आहे, काही ग्रामपंचायत निवडणुका या प्रतिष्ठेच्या ठरत…

Read More

“जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयाच्या कोरलेलं असलं जगणं म्हणजे खरं जगणं त्यांच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनातील सुरुवात पहिल्याच नजरेत त्यांनी मला आपलसं करून घेतलं होत, त्यांचा तो गौर वर्ण , सिंहासम स्वाभिमानाने भरलेला तेजस्वी चेहरा ,त्यांच्या बोलण्यातील करारी बाणा , हिमालयासारखी उंची,चमकत्या डोळ्यातील कर्तृत्वाची धजग, बलशाली शरीर, वक्तृत्व तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावेत त्यांच्या पहिल्याच lecture मध्ये मी मनोमन माझं सर्वस्व देऊन बसले होते माझा कुणी जीवन साथी असतील तर फक्त हेच त्यांना बघताच मला माझ्या “त्या स्वप्नाची” आठवण झाली जे मला रोज…

Read More