खासदार नीलेश लंके Nilesh lanke आणि सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये पारनेर बसस्थानकावर चांगलीच धुमचक्री झाली. यात लंके यांचे निष्ठावान कार्यकर्ते राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय या धुमचक्रीत ,लंके आणि विखे असे दोन्ही गटातील डझनभर कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पारनेर बसस्थानकावर भर दुपारी ही धुमचक्री झाल्याने पळापळ झाली. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरूवात केली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नीलेश लंके आणि भाजपचे (BJP) सुजय विखे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. यात नीलेश लंके खासदार झाले. लोकसभेसाठी विखे यांनी लंके यांच्या होमग्राऊंडवर बरीच फोडाफोडी केली. लंकेंच्या जवळचे कार्यकर्ते फोडून विखेंनी बरोबर घेतले. माजी…
Author: mahalokwani
लोकसभा निकालात महाराष्ट्राने भाजपच्या मनसुब्यावर मोठे पाणी फेरले. यामध्ये मराठा फॅक्टर अनेक मतदारसंघात प्रभावी दिसला. भाजपच्या काही दिग्गजांना मराठा फॅक्टराचा थेट परिणाम दिसला. अनेक मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे दुखावलेल्या समाजाने मतपत्रिकेतून नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. आता लोकसभा निकालानंतर मनोज जरांगे Manoj Jarange पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मराठा फॅक्टरची अप्रत्यक्ष आठवण करुन देत असा इशारा दिला. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Manoj Jarange लोकसभा निकालात मराठ्यांनी आपली ताकद दाखविली मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षीच्या मध्यात मोठी घाडमोड घडली. मराठा आरक्षणासाठी मोठे…
जामखेड राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ वी जयंती जामखेड येथील पंचायत समिती सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली . राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, कक्ष अधिकारी चौसाळकर, विस्तार अधिकारी भाऊसाहेब माने, अधिक्षक शिर्के, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव, नरवडे, तसेच कार्यालयीन कर्मचारी लक्ष्मण शिंदे, पुराणे, केरुळकर, सुधीर घायतडक तसेच महिला कर्मचारी मुरुमकर मॅडम, कुलकर्णी मॅडम ,सानप मॅडम,डोळसे मॅडम नन्नवरे मॅडम, कात्रजकर मॅडम,वराट मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात एकूण 11 जागांसाठी मतदान होत आहे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात पंकजा मुंडे, रक्षा खडसे, अमोल कोल्हे, सुजय विखे पाटील, रावसाहेब दानवे, इम्तियाज जलील आदी नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान टाकलं जात आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्कही बजवायला सुरुवात केली आहे. या दरम्यान राजकीय नेत्यांकडून अनेक दावेप्रतिदावेही केले जात आहेत. ही चर्चा सुरू असतानाच अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे…
जामखेड प्रतिनिधी शेतकऱ्यांचे सरकार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत.२४ तास वीज देणार आहेत.विरोधकांना दुकान बंद करण्याची वेळ आली आहे.कारण काँग्रेस मध्ये विलीनीकरण होणार आहे. शरद पवार यांना आपले दुकान बंद करण्याची वेळ आली आहे. ते लवकरच काँग्रेस मध्ये विलिन होणार असुन सोबत उद्धव ठाकरे यांना पण घेऊन जाणार आहेत.मोदींचे इंजीन मजबुत आहे या इंजिनला वेगवेगळे डबे जोडले आहेत. मात्र काँग्रेसच्या इंजिनमध्ये फक्त नेतेच आहेत, तिथे जनतेला बसण्यास जागा नाही. आघाडीतील नेत्यांना कन्व्हीन्सही करता येत नाही म्हणून ते जनतेला कन्फ्युज करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील जाहीर सभेत केली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे…
वर्शीप अर्थ फाऊंडेशन व महालोकवाणी न्यूजचा संयुक्त उपक्रम ! नगर जिल्ह्यातील युवकांना सक्षम करून रोजगाराच्या संधीकडे घेऊन जाणाऱ्या समर्थ प्रकल्पांतर्गत कौशल्य प्रशिक्षणासह नोकरी Job नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी कौशल्य प्रशिक्षणासह नोकरीची संधी मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. वर्शिप अर्थ फाऊंडेशन व महालोकवाणी न्यूजच्या वतीने ३५ दिवसांचा मोफत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम शनिवार ता. ११ मे पासून सुरु होणार आहे. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Job | नगर जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यर्थ्यांना जीएसटी/ टॅली, टायपिंग, कॉम्प्युटर, इंग्रजी बोलणे, मुलाखत तंत्र, संवाद कला, व्यक्तिमत्व विकास यासह विविध…
जामखेड प्रतिनिधी प्रचारासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचविण्यासाठी उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांनी ‘घर ते घर’ प्रचाराचा वेग वाढविला आहे.आज रोजी जामखेड शहरातील मोरे वस्ति,शिक्षक काॅलनी,विद्या काॅलनी, संताजी नगर, शिवाजी नगर,दत्त नगर येथे निलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर टू घर प्रचार केला. यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रकाश सदाफुले, शहाजी राळेभात,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे,आम आदमी पार्टी चे संतोष नवलाखा, नगरसेवक मोहन पवार,अमित जाधव, संभाजी राळेभात,महेंद्र राळेभात, प्रशांत राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, प्रविण उगले,अजय भोसले, बजरंग डूचे, वसीम सय्यद, कुंडल…
सर्व पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा नगर : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खा. डॉ. सुजय विखे यांना पाठींबा देण्याच्या घोषणेचे बुमरँग माजी आमदार विजयराव औटी यांच्यावर उलटले आहे. तालुकाप्रमुखांसह पाचही पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी नगर येथे पत्रकार परीषद घेउन आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचे स्पष्ट करून विजय औटी यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नसल्याची घोषणा पत्रकार परीषदेत केली. दोन दिवसांपूर्वी औटी यांनी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, महिला आघाडीप्रमुख प्रियंका खिलारी, युवा सेना तालुका प्रमुख अनिल शेटे, ज्येष्ठ नेते मा. पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी उध्दव…
केडगांव : प्रतिनिधी आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील. असे सांगत आ. नीलेश लंके Nilesh lanke यांनी केडगांवातील गुंडगिरी हद्दपार करण्याची ग्वाही दिली. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! Nilesh lanke | केडगांवकरांच्या मी पाठीशी लोकसभा निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या…
नगर : प्रतिनिधीनीलेश लंके यांना घेरण्यासाठी डमी निलेश लंके या उमेदवारासह एम आय एम, वंचित बहुजन आघाडी आदी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात करण्याची खेळी करणाऱ्या सुजय विखे यांना आमदार निलेश लंके यांनी धोबीपछाड दिली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून विखे यांची यंत्रणा वेगवेगळ्या क्लुप्त्या लढऊन समोरच्या उमेदवारास नामोहरम करीत असे. या निवडणुकीतही तसेच झाले. मात्र विखे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नीलेश लंके यांनी विखे यांचा क्लीन बोल्ड करीत त्यांच्या डावपेचाना परतून लावण्यात यश मिळविल्याचे अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर विखे यांनी लंके यांना बॅक फूटवर आणण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला, मात्र वेळोवेळी खा. विखे…