Author: mahalokwani

Ahmednagar अहमदनगरमध्ये जमिनीचा महाघोटाळा अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९ जुलै):-खोटे कागदपत्र तयार करुन,जमिनीची खरेदी विक्री व्यवहार केल्या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,सहाय्यक दुय्यम निंबंधक नगर Ahmednagar ,तहसिलदार,तलाठी,मंडळ अधिकारी,यांच्यासह 32 खाजगी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कामगिरी केली आहे.बातमीतील हकीगत अशी की,दि.३/१ २००६ रोजी पूर्वी ते दि.६/१/२००६ रोजी मौजे वडगांव गुप्ता शिवारातील गट नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर, गट नं.२०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर,३४ आर ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसिलदार अहमदनगर यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे. नगरमध्ये चोर सोडून संन्याशाला…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार दोन खोल्यांच्या कामाचे भूमिपूजन करतांना आकाश बाफना वडीलांचा वसा आणि वारसा पुढे चालवत असताना आज रोजी जामखेड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद चे चेअरमन दिलीप बाफना यांचे पूत्र आकाश बाफना यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ,निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. कुमारी क्रिषा आकाश बाफना हिच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह, मोहा फाटा (समता भूमी) ता-जामखेड जि- अहमदनगर येथे मुले व मुलींचे वसतिगृह येथे मुलींना राहण्यासाठी खोली बांधून देण्याचे आश्वासन…

Read More

धनराज पवार JAMKHED या कृषी महाविद्यालयात टँकरने पाणीपुरवठा जामखेडJAMKHED तालुक्यातील हळगाव येथील कृषी महाविद्यालयाचा परिसर जवळ पास १०० एकर आहे. १०० एकर शेती कायमस्वरूपी प्रयोगासाठी उपयोगात आणण्यासाठी साधरण १० इंच आकाराची कायमस्वरूपी जलस्त्रोत असलेल्या ठिकाणावरून पाईप लाईन करणे आवश्यक आहे . वाचा जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार आज रोजी चक्क पावसाळ्यात या कृषी महािद्यालयाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे आणि या वर कृषी महाविद्यालयं चालणार असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. येथे पाणी उपलब्ध करण्यासाठी तात्पुरते पर्याय शोधले असतीलही मात्र त्या मधुन समस्या सुटण्याची शक्यता अजिबात नाही तरी यावर जे कायम स्वरुपी पर्याय आवश्यक…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड ( जि. अहमदनगर) : जामखेड शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलीसावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. जखमी आरोपीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. जामखेड पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव…

Read More

Kirit Somaiya Viral Video भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या kirit somaiya सध्या प्रचंड अडचणीत आहेत. सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशात खळबळ उडाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी सोमय्या यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमय्या यांच्या विरोधात काल राज्यभरात निदर्शने करण्यात आली. आजही या प्रकरणी आंदोलने होण्याची शक्यता आहे. या घटनेचे विधानसभा आणि विधान परिषदेतही पडसाद उमटले. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर अजितदादा गटानेही या प्रकरणी भाजपला घरचा आहेर दिला आहे. या प्रकरणाची चौकशी कराच, पण किरीट सोमय्या kirit somaiya यांचीही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी अजितदादा गटाच्या…

Read More

Asia champion आशिया चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड तालुक्यातील शिऊर येथील पै.सुजय नागनाथ तनपुरे यांनी ६८ किलो गटा मध्ये आशिया चॅम्पियन Asia champion कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळाले असून लोहगाव,पुणे विमानतळावर पै सुजय नागनाथ तनपुरे यांचे जोरदार स्वागत करून डि. वाय.एस्. पी. विजय चौधरी ( तिन वेळा महाराष्ट्र केसरी), उप महाराष्ट्र केसरी तथा मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन चे अध्यक्ष बबन (काका) काशिद यांनी सत्कार व अभिनंदन केले. यावेळी अक्षय शिंदे ( उप महाराष्ट्र केसरी) बाजार समिती चे माजी सभापती गौतम उतेकर, उद्योजक गोकुळ म्हेत्रे,पै.पंकज हरपूडे तसेच मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल चे सर्व मल्ल मोठ्या…

Read More

ठेकेदाराची चौकशीची मागणी ,कारवाई न झाल्यास उपोषण ! जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातील बीड रोड ते पोलीस स्टेशन पर्यंत च्या झालेल्या कॉँक्रिट रस्त्याचे काम निकृष्ठ झाले असुन एका वर्षाच्या आतच सदर रस्त्याच्या एका बाजुचा रस्ता अक्षरशः भेगा पडून मटेरियल निघाले असूनसुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सोमवार दिनांक १७ व १८ जुलै २०२३ रोजी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चे शशिकांत सुतार व जामखेड नगर परिषदे चे मुख्याधिकारी अजय साळवे यांना बीड रोड ते पोलीस स्टेशन पर्यंत च्या झालेल्या कॉँक्रिट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे कामाबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख सरफराज पठाण, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्तफा (मेजर) शेख, अल्पसंख्याक…

Read More

नगरमध्ये गुन्हेगार मोकाट मात्र सर्वसामान्यांनाच पोलिसांचा त्रास अहमदनगर : नगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोडला झालेल्या मर्डरची घटना ताजी असतानाच आता सावेडीमधील एकविरा चौकात दुसरा मर्डर झालाय. मात्र नगर पोलीस गुन्हेगारांना सोडून सर्वसामान्यांना त्रास देताना दिसत आहेत. शहरातील सिग्नल वरती पोलीस प्रशासन सर्वसामान्य लोकांना विचारपूस करण्याच्या नावाखाली त्रास देऊन दंड घेतायेत. एकीकडे राज्यातील नेते विधानसभेत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत असताना नगरमध्ये पोलीस प्रशासनाच्या या दादागिरीला सर्वसामान्य लोक बळी पडताना दिसत आहेत. मागील सहा ते सात महिन्यांमध्ये सातत्याने नगर शहरात तसेच जिल्ह्यात खून, दरोडे, चेन स्नॅचिंग असे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहेत. प्रशासनाच्या कृपा आशीर्वादानेच मोठ्या प्रमाणात…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड -श्रीगोंदा महामार्ग कामामुळे किती बळी..? रामेश्वर (सौताडा, ता. (पाटोदा, जि. बीड) येथे देवदर्शन घेऊन ढवळगाव (ता. श्रीगोंदा) येथे जाण्यासाठी निघालेल्या युवकाचा जामखेड-कर्जत रस्त्यावरील केजीएन फर्निचरसमोर (जाधव वस्ती) डंपर-दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सचिन सुखदेव गव्हाणे (वय २२, रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम संजय भांबरे (रा. शिरसगाव बोडखा, ता. श्रीगोंदा) याने याबाबत जामखेड पोलिसांत खबर दिली. जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा अनोखा उपक्रम; शिक्षण विभाग आपल्या दारी.! उपक्रमाचे पालकांकडून कौतुक.. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सचिन गव्हाणे, त्याची पत्नी मोनिका, विशाल गव्हाणे, शुभम…

Read More

rain update : राज्यात अजूनही हवा तसा पाऊस Rain झालेला नाही.राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु आता राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्धा जुलै महिना झाला आहे तरी राज्यांत अजूनही पुरेसा पाऊस Rain नाही. राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची पातळी खालवली आहे. उशिरा आलेला मान्सून त्यानंतर पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पाऊस सुरु झालाय. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुणे…

Read More