प्रा सचिन सर गायवळ जामखेडच्या राजकारणात काय भुमिका घेणार हा अनेक दिवसापासुन चर्चेचा असलेला विषय थांबण्याची शक्यता, प्रा सचिन सर गायवळ यांची राजकीय भुमिका लवकरच होणार स्पष्ट प्रा आ राम शिंदेसाहेब आणि प्रा सचिन सर गायवळजामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकत्र येण्याचे संकेत, तालुक्यातील हे दोन मोठे नेतृत्व एकत्र आल्यास जामखेड मधील राजकारणाचे समीकरण बदलणार. प्रा सचिन सर गायवळ यांना मानणारा मोठा वर्ग जामखेड तालुक्याच्या सक्रीय राजकारणात कार्यरत आहे त्या मध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे त्यामुळे प्रा सचिन सर आणि प्रा आ राम शिंदेसाहेब एकत्र येऊन निवडणुक लढविल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर भारतीय जनता पार्टिच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल…
Author: mahalokwani
मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या परिषदेला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांच्या संघटनेची संलग्नता असलेल्या भारतीय कुस्तीगीर महासंघ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे अनेक वर्ष अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार यांना कुस्ती क्षेत्रात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे भारतीय कुस्तीगीर महासंघाची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेपूर्वी महासंघाच्या कार्यकारणीची बैठक झाली या बैठकीमध्ये शरद पवारांच्या कुस्तीगीर परिषदेला पाठवलेल्या नोटीसीवर चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा यावर चर्चा करून शरद पवार यांच्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्यात आली आहे
अॅपल कंपनी भारतातील आपले पहिले अधिकृत अॅपल स्टोअर १८ एप्रिलला मुंबईत सुरु करणार आहे मुबंई बीकेसीमधील रिलायन्स जिओ वर्ल्डमध्ये अॅपल स्टोअर सुरु होईल. तर दुसरे अॅपल स्टोअर Apple Store २० एप्रिल रोजी दिल्लीच्या साकेत भागात उघडणार आहे. यामुळे आयफोन iphone धारकांना एक आनंददायी बातमी आहे या स्टोअरमुळे भारतात आयफोनच्या किमती मोठी घसरण पाहायला मिळू शकते किंवा कमी किमतीमध्ये मध्यमवर्गीयांना परवडण अशा किमतीत आयफोन मिळू शकतो यापूर्वी आयफोनची iphone निर्मिती ही भारताबाहेर होत असल्याने या आय फोनवर जीएसटी टॅक्स तसेच इतर काही टॅक्स लागून याची किंमत भारतामध्ये जास्त मोजावे लागत होते परंतु आता आय फोनची निर्मिती ही भारतात होत असल्याने आय…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार आमदार रोहित पवार नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रसंगात गरजूंना मदत करत असतात. अडचणीच्या काळामध्ये मग तो मनुष्य असेल अथवा पशु पक्षी प्राणी त्याच्या मदतीला तात्काळ धावून जाणे हा रोहित पवार यांचा स्वभावच आहे. असाच एक अनुभव आज कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर असताना आला. जाळ्यात अडकलेल्या पक्षाची त्यांनी सूटका केली. कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना कर्जत तालुक्यातील वांबोरी येथे जाताना अचानक एक साळुंकी पक्षी जाळ्यात अडकला असल्याचं आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आल. त्यांनी आपला ताफा जागीच थांबवला व सहकाऱ्यांच्या मदतीने थेट त्या पक्षाजवळ जाऊन त्याला तात्काळ आपल्या दोन्ही हातात उचलून घेतले. स्वतः हातात कात्री घेऊन जाळ्याचे दोर रोहित…
महालोकवाणी न्यूज: आज दिनांक 16 एप्रिल 2023 जामखेड येथे विलास साठे यांनी प्रेस घेऊन पिपल्स एजुकेशन सोसायटी, जामखेड या पन्नास वर्ष जुन्या व नामांकित शिक्षण संस्थेचा कारभार गेली बावीस वर्ष बोगस संचालक मंडळ पहात आहे. याची पोलखोल केली या शिक्षण संस्थेचे २००१ ते २०२२ पर्यंतचे सर्व पदाधिकारी बदलअर्ज मा. धर्मदाय उपायुक्त, अहमदनगर यांनी दि. २३/०९/२०२२ रोजी रद्द ठरवले आहेत. या बावीस वर्षात आपण सदर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी नाहीत हे माहित असूनदेखील दहशतीने संस्था ताब्यात ठेवून करोडो रुपयाचे व्यवहार केले आहेत. जामखेडमध्ये शैक्षणिक भूकंप; दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे 22 वर्ष बोगस संचालक मंडळ; लवकरचं मोठा गैरव्यवहार होणार उघड ?#jamkhed #maharashtraeducation pic.twitter.com/0WtMeb8ASI—…
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त जामखेड शहरातील मिलींदनगर परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता जामखेड चे तहसिलदार योगेश चंद्रे, यांच्या शुभ हस्ते पंचशील ध्वज फडकवण्यात आला. तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील, नगर परिषद चे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध वंदना घेऊन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच लेझिम पथकातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सन्मानित करण्यात आले.लेझिम पथकातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी प्रात्याक्षिक दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा. मधुकर राळेभात ,वंचित बहुजन आघाडी चे नेते अँड…
आज दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी पाचच्या वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील अरणविहिरा ,तागडखेड ,वेलतुरी देवळाली, घाटापिंपरी गोखेल, सह परिसरात गारांचा वर्षाव होऊन शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे बीड: बळीराजा शेतकऱ्यांवर कोपला; आष्टीतील अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, घाटा पिंपरी, देवळाली, गौखेलसह परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान…#maharashtraRain @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SandipKshirsagr @sureshdhas1 pic.twitter.com/F51CqkOGgg— Mahalokwani (@mahalokwani) April 15, 2023 मागील चार ते पाच दिवसापासून नगर- बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही प्रचंड मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारांचा वर्षाव तसेच ढगफुटीसदृश्य परिस्थिती पाहावयास मिळत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाघाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतलेला पाहावयास मिळत आहे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुद्धा सरकारला…
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे बस दरीत कोसळून 12 जण ठार तर 27 जण जखमी झाले. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या संगीत पथकाची खासगी बस पहाटे ४.५० वाजता शिंगरोवा मंदिराजवळ महामार्गावर दरीत कोसळली. हा अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या बस अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि एसपी आणि बचाव कार्यात गुंतलेल्या टीमशीही चर्चा केली. यासोबतच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. अधिकारी म्हणाले, या बसमध्ये गोरेगाव, मुंबई येथील ‘बाजी प्रभू वादक ग्रुप’चे सदस्य…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार दि.१४ एप्रिल रोजी तपनेश्वर रोड नाथ नगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अँड. डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी अँड डॉ. अरुण (आबा) जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. व पुढे म्हणाले. की छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. तेच स्वातंत्र टिकून राहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शिकवण दिली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. रक्ताचा एक…
अहमदनगरमधील कापडबाजारात आज धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुले व्यापारी वर्गातही संताप दिसून येत आहे. भरबाजारात खळबळजनक घटना अहमदनगर शहरात घडली आहे. व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्या झाला असून दोघेही व्यापारी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपक नवलानी आणि प्राणिल बोगावत अशी हल्ला झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाबाहेर व्यापाऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे. कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद करण्याचा घेतला आहे